Afghanistan: अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात 6 मुलांचा मृत्यू

संभाव्य हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने काबूलमध्ये ड्रोन हल्ले केले. अमेरिकेच्या या हल्ल्यामध्ये सहा निष्पाप मुलांसह नऊ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Afghanistan: अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात 6 मुलांचा मृत्यू
Afghanistan: अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात 6 मुलांचा मृत्यूSaam Tv
Published On

आयसिसच्या दहशतवाद्यांनी ISIS terrorist काबूलमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेने या हल्ल्याचा बदला घेऊ अशी घोषणा केली होती. तसेच संभाव्य हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने काबूलमध्ये Kabul ड्रोन हल्ले केले. अमेरिकेच्या या हल्ल्यामध्ये सहा निष्पाप मुलांसह नऊ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अमेरिकेच्या बायडेन सरकारवर Joe Biden टीका होऊ लागली आहे. तसेच माहितीनुसार हे सर्व मृत हे एकाच कुटुंबातील होते.

अमेरिकेने अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये निवासी भागात ड्रोन स्ट्राइक केले ज्यामध्ये कथितरीत्या इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रांताशी (ISKP) संबंधित “एकाधिक आत्मघातकी बॉम्बर्स” multiple suicide bombers वाहून नेणाऱ्या वाहनाला लक्ष्य केले गेले.

इस्‍लामिक स्‍टेट खुरासान गटाचे दहशतवादी काबूल विमानतळावर Kabul Airport आणखी हल्ले करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती आहे. हे दहशतवादी बसलेल्या एका वाहनाला ड्रोनने Drone उडविण्यात आले. हे वाहन रहिवासी भागातून जात होते यामुळे त्या परिसरात असलेल्या 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानची (Afganistan Bomb blast) राजधानी काबूल (Kabul) आज पुन्हा एकदा काल स्फोटाने हादरली. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते की, हा स्फोट काबूलच्या विमानतळाजवळील निवासी भागात झाला. वृत्तसंस्था एपीने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले की, हा रॉकेट हल्ला होता. त्याचवेळी, न्यूज एजन्सी रॉयटर्सने दोन अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले होते की अमेरिकेने काबुलमधील संशयित इसिस-के दहशतवाद्यांना लक्ष्य करून हा हल्ला केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com