वाशिंग्टन : अमेरिकेतील America विस्कॉन्सिन येथे रविवारी (ता. २१) संध्याकाळी एक भरधाव वेगात असलेली कार थेट ख्रिसमसच्या परेडमध्ये (Christmas Parade) घुसली आहे. माहितीनुसार, या घटनेत 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. येथील वाउकेशाच्या मिल्वौकीमध्ये झालेल्या या घटनेची तपास सुरु आहे अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वृत्तानुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. वाउकेशाच्या मिल्वौकीमध्ये आयोजित वार्षिक परंपरा पाहण्यासाठी तेथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रमुख डॅन थॉम्पसन यांनी घटनेबद्दल पत्रकारांना माहिती दिली की, "लाल रंगाची एसयूव्ही कार ख्रिसमसच्या परेडमध्ये घुसली आणि त्यावेळी आम्ही शहराच्या मध्यभागी होतो. या घटनेत कारने 20 हून अधिक लोकांना धडक दिली आणि यामुळे लोक जखमी झाले." व्हिडिओत दिसून येत असल्याप्रमाणे त्या कारने अनेक लोकांना फरफटत नेले आहे.
वाउकेशाच्या पोलीस विभागाने एक संशयास्पद कार जप्त केली आहे त्या घटनेबद्दल पोलीस तपास घेत आहेत, असेही पोलीस प्रमुख डॅन थॉम्पसन यांनी सांगितले. तेथील उपस्थित असलेल्यांनी सांगितलं की, आम्ही एक एसयूव्ही जवळून जाताना पाहिली आणि नंतर आम्हाला लोकांचा ओरडण्याचा मोठा आवाज ऐकू आला अशी माहिती अँजेलिटो टेनोरिओ यांनी दिली.
दरम्यान, या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जर्नल सेंटिनेलने सांगितले की, फुटेजमध्ये एसयूव्ही कार शाळेच्या मार्चिंग बँडच्या मागून परेडमध्ये वेगाने जात असल्याचे दिसून आले आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.