Gyanvapi Mosque issue : अलाहाबाद हायकोर्टाने ज्ञानवापीच्या सर्वेक्षणावरील स्थगिती वाढवली, कोर्टात आज काय झालं?

Gyanvapi Mosque issue : अलाहाबाद हायकोर्टात सुरू असलेल्या ज्ञानवापी प्रकरणात दुपारी ४.३० वाजता पुन्हा सुनावणी झाली.
Gyanvapi Mosque issue
Gyanvapi Mosque issueSaam TV
Published On

Uttar Pradesh News : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी कॅम्पसमधील एएसआय सर्वेक्षणावरील स्थगिती उद्यापर्यंत वाढवली आहे. आता उद्या म्हणजेच 27 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. अलाहाबाद हायकोर्टात सुरू असलेल्या ज्ञानवापी प्रकरणात दुपारी ४.३० वाजता पुन्हा सुनावणी झाली.

एएसआयचे (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) अतिरिक्त उपसंचालक आलोक त्रिपाठी न्यायालयात पोहोचले होते. सर्वेक्षणामुळे ज्ञानवापी कॅम्पसचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात सादर केले. आतापर्यंत सर्वेक्षणाचे ५ टक्के काम झाल्याचे त्यांनी सांगितले. (Latest News Update)

एएसआयचे प्रतिज्ञापत्र वाचण्यासाठी आणि त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी त्यांना आणखी काही वेळ द्यावा, असे मुस्लिम पक्षाने म्हटले होते. हे पाहता न्यायालयाने ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाला तूर्तास स्थगिती दिली आहे. (Uttar Pradesh News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com