Holi Festival: होळीआधी 'या' मशिदीवर का टाकला जातो पडदा? ; वाचा गेल्या ६ वर्षांपासून सुरू असलेली परंपरा

६ वर्षांपूर्वी मशिदीवर रंग पडल्याने खूप वाद झाले आहेत.
Holi Festival
Holi FestivalANI

Aligarh Mosque : होळी म्हणजे रंगांची उधळण,मात्र अलीगढ येथील अब्दुल करीम चौकात असलेली मशीद आज पूर्ण झाकून ठेवण्यात आली आहे. रंग खेळल्यामुळे येथील भींती खराब होतात त्यामुळे या भींती झाकल्याचं म्हटलं जात आहे. या आधी या ठिकाणी होळीमध्ये रंग उडाल्यामुळे वाद झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे मशीद झाकून ठेवण्यात आली आहे. (Latest Aligarh Mosque News)

अब्दुल करिब चौक हा शहरातील मोठा चौक आहे. त्यामुळे दर वर्षी या ठिकाणी मोठ्या जल्लोषात होळी खेळली जाते. आजच्या दिवशी शहरातील अनेक नागरिक या ठिकाणी रंग खेळण्यासाठी येत असतात. मात्र यामुळे मशिदीच्या भींतीला कोणताही रंग लागू नये यासाठी गेल्या ६ वर्षांपासून मशिदीवर पांघरून घालण्यात येत आहे.

६ वर्षांपूर्वी मशिदीवर रंग पडल्याने खूप वाद झाले आहेत. शांतता आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि प्रादेशिक मुस्लीम समाजाच्या व्यक्तींनी हा निर्णय घेतला आहे. आज ही मशीद कापट आणि काळ्या रंगाच्या पिशवीने झाकण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे करण्यात आला आहे. दर वर्षी होळीला मशिदीजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असतो.

६ वर्षांपासून मशिदीवर टाकला जातोय पडदा

अलीगढमध्ये सामाजिक तेढ कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुस्लिम समाज खूश आहे. शासनाच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. दर वर्षी मशिदीवर होळी सणाच्या एक दिवस आधी कापड आणि प्लास्टीक टाकण्यात येतं. या आधी परिसरात झाल्यालेल्या भांडणामुळे पोलीस कालपासूनच या ठिकाणी तैनात आहेत.

कोणताही अनुचित प्रतार आढळल्यास पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांक देखील जारी केलेत.

प्रभारी सायबर सेल (७८३९८७६३७७), एसपी सिटी (९४५४४०१०११), एसपी देहत (९४५४४०१०१२), सीओ I (९४५४४०१२३९),सीओ (४५४४०१२४०), सीओ (४५४०१२४०), Iglas (9454401243), कंट्री लाइन (9454402801), सिटी कंट्रोल रूम (9454402801), एसपी क्राइम (९४५४४०२८१०), सीओ II (९४५४४०१२४०), सीओ (४५४४०१२४०) हे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com