Video : चिंता करू नका! आम्ही सर्वात जास्त कंडोम वापरतो; मोहन भागवतांना ओवेसींचे प्रत्युत्तर

"चिंता करू नका, मुस्लिम लोकसंख्या वाढत नाहीय उलट कमी होत आहे"
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSaam Tv
Published On

हैदराबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या धर्म-आधारित वाढत्या लोकसंख्येवर केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, चिंता करू नका, मुस्लिम लोकसंख्या वाढत नाहीय उलट कमी होत आहे. सर्वाधिक कंडोमचा वापर कोण करत आहे? आम्हीच आहोत.

Asaduddin Owaisi
Shivsena: ECI ने शिवसनेचं निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शिवसैनिक भारावले...

यावर मोहन भागवत काही बोलणार नाहीत, मी तथ्य सांगत आहे. लोकसंख्या कुठे वाढतेय मोहन भागवत साहेब. तुम्ही डेटा ठेवून बोलत नाही. डेटा ठेवण्याबद्दल बोलणार नाही. असे प्रतिउत्तर ओवेसी यांनी मोहन भागवत दिले आहे. एका सभेला संबोधित करत असताना ओवेसी यांनी मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणासाठी काय काय करत आहेत. ते सांगितले. दोन मुलांमधील सर्वाधिक अंतरही मुस्लिम ठेवत असल्याचा दावाही ओवेसी यांनी केला.

काय म्हणाले मोहन भागवत?

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी (५ ऑक्टोबर) दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हटले होते की, देशाला सर्वसमावेशक लोकसंख्या धोरणाची गरज आहे. धर्म आधारित लोकसंख्येच्या असंतुलनाचा फटका देशाला बसला आहे. समुदाय आधारित लोकसंख्या असमतोल हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असे म्हटले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com