कंधार : अफगाणिस्तानात Afghanistan मोठ्या प्रमाणात हिंसक घटना सध्या घडत आहे. अमेरिकने Americans आपले सैन्य माघारी घेतल्यावर, तालिबाने सातत्याने हल्ले करत आहेत. तालिबान असाही दावा करत आहे की, त्यांनी त्याठिकाणी ९० टक्क्याहून जास्त भागावर कब्जा केला आहे. मात्र, अफगाणिस्तान मधील सैन्याकडून नेहमी हे सांगण्यात येत आहे. की ते तालिबानवर सातत्याने हल्ले करत आहे.
हे देखील पहा-
रविवारी अफगाणिस्तान कडून असा दावा करण्यात आला आहे. की त्यांनी तालिबानच्या २५४ दहशतवाद्यांना ठार केले आहे. या मध्ये तालिबान्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक Air strike केल्याचे बघायला मिळत आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याकडून हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात बघायला मिळते, की समोर अनेक इमारती आहेत. ज्या एखाद्या कॅम्पसप्रमाणे दिसत आहेत.
अफगाणिस्तानचा दावा आहे. की अथे तालिबानी दहशतवादी terrorists लपलेले होते. ते फोटो मधून दिसतं आहे. की इमारतींवर अफगाणिस्तान कडून एअर स्ट्राइक केले जातं आहे. अवघ्या सेकंदा मध्ये सगळे काही जमीनदोस्त झाले आहे. अफगाणिस्तानचा असा दावा आहे, की या परिसरामध्ये तालिबानचे अनेक आतंकवादी मारले गेले आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये गजनी, कंधार, हेरात, फराह, जोजजान, बल्ख, समांगन, हेलमंद, तखर, कुंदुज, बगलान, काबुल आणि कपिसा याठिकाणीच्या ऑपरेशनमध्ये २५४ तालिबानी दहशतवादी आतापर्यंत मारले गेले आहेत. सोबतच ९७ जखमी झाले आहेत. असे म्हटले जात आहे. की ग्रामीण क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या ठिकाणांवर कब्जा केल्याने तालिबानींनी आता राज्याच्या राजधान्यांना लक्ष्य केंद्रित करण्यास सुरुवात केलेली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.