Afghanistan: तालिबानने 7 दिवसांत मिळवले 18 राज्यांवर वर्चस्व

तालिबानचे 7 दिवसांत 18 राज्यांवर वर्चस्व मिळवले आहे. अराजकाची स्थिती, अनेक नेते- गव्हर्नरनी शासन स्वीकारले
Afghanistan: तालिबानने 7 दिवसांत मिळवले 18 राज्यांवर वर्चस्व
Afghanistan: तालिबानने 7 दिवसांत मिळवले 18 राज्यांवर वर्चस्वSaam Tv
Published On

Afghanistan : अफगाणिस्तान Afghanistan मधील परिस्थिती सतत बिघडत चाली आहे. एकानंतर दुसऱ्या प्रांतावर तालिबानचे Taliban वर्चस्व निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. चारही बाजूने अराजकाची स्थिती दिसत आहे. तालिबानने एका दिवसात ६ प्रांतांवर province आपली सत्ता मिळवली आहे. अफगाणिस्तान मधील सर्वात मोठे शहर कंदहार Kandahar बरोबर १८ प्रांतांना दहशतीचा विळखा घातलेला आहे.

कंदहारवर देखील ताबा मिळवला आहे. लष्करी छावण्यांचे शहर आणि पश्चिम प्रांत घोरच्या राजधानीवर वर्चस्व मिळवलेले आहे. आता तालिबानचे लक्ष्य काबूल केलेलं आहे. पश्चिमेकडे देशांनी आपल्या राजदूतांना अफगाण सोडण्याची तयारीला लागली आहे. तालिबानच्या विरोधात मध्ये लढणारे गटही आता शरणागती पत्करले आहे. हेराट प्रांताच्या सरकारने असेच लोटांगण घातले आहे.

हे देखील पहा-

माजी मंत्री, हेराट प्रांताचे गव्हर्नर Governor, पोलिस Police प्रमुख, एनडीएस NDS कार्यालयाचे प्रमुख यांना तालिबानने ताब्यात घेतले आहे. त्याशिवाय तालिबानच्या विरोधात मध्ये युद्धाचे प्रतीक राहिले आहे. मोहंमद इस्माईल खान (वय-७५) यांना तालिबानने पकडलेले आहे. इस्माईल खान तालिबान विरोधामध्ये लढणाऱ्यांमध्ये अग्रेसर आहे. तालिबानच्या वाढत्या कारवाया बघून युरोपीय European संघाने तालिबानला इशारा दिला आहे.

तालिबानने हिंसाचारामधून सत्ता काबीज केल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळणारच नाही. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा हे देखील आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेला सुरुवात केलेली आहे. अमेरिकेने ३ हजार सैनिकांना पुन्हा अफगाणिस्तानात पाठवले आहे. ते मुत्सद्यांना सुरक्षित काढण्याचे काम करणार आहे. ब्रिटन Britain आणि कॅनडा Canada देखील मुत्सद्यांना काढण्यासाठी विशेष दल पाठवणार आहे.

Afghanistan: तालिबानने 7 दिवसांत मिळवले 18 राज्यांवर वर्चस्व
तालिबान आणि अन्य दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्ये मुक्तपणे संचार

हे कमांडो काबूल मधील ब्रिटिश रहिवासी आणि कॅनडाच्या रहिवासी याना सोडण्यासाठी मुत्सद्दयांना मदत करणार आहे. ब्रिटनने ६०० सैनिक पाठवले आहेत. तालिबान आता आपली संघटना बळकट करणे आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याकरिता अंमली पदार्थाद्वारे कराच्या पैशावर नजर ठेवण्यात आले आहे. टोरंटो या ठिकाणी थिंक टँकनुसार तालिबानला अफगाणिस्तान मधून हटवण्यात आले आहे. तेव्हा या दहशतवादी संघटनेने पैसा वसूल करत आपली ताकद वाढवली आहे.

तालिबान अर्थव्यवस्थेत अनेक टप्प्यावर लावलेल्या करांमधून पैसा कमावत आहे. त्यातमध्ये अफीमचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून १० टक्के शेती कराचा समावेश करण्यात आला आहे. तालिबान देशातील वेगवेगळ्या भागात वीज ग्राहकांना देयके पाठवून वार्षिक २० लाख अमेरिकी डॉलरहून सुमारे १४.८५ कोटी रुपये जास्त कमाई करण्यात येत आहे. तालिबान अफगाणिस्तानच्या २ लाख हेक्टरवर अफीमची शेती होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com