अफगाणिस्तानचा असा प्रांत ज्याला तालिबान घाबरतो; जाणून घ्या सद्यस्थिती

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानची (Afganistan) राजधानी काबूलवर (Kabul) पूर्णपणे कब्जा केला आहे.
अफगाणिस्तानचा असा प्रांत ज्याला तालिबान घाबरतो; जाणून घ्या सद्यस्थिती
अफगाणिस्तानचा असा प्रांत ज्याला तालिबान घाबरतो; जाणून घ्या सद्यस्थितीSaam Tv
Published On

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानची (Afganistan) राजधानी काबूलवर (Kabul) पूर्णपणे कब्जा केला आहे, परंतु येथून 125 किलोमीटर अंतरावरील पंजशीर (Panshir) खोरे अजूनही तालिबानच्या ताब्यापासून मुक्त आहे. अफगाणिस्तानचा हा भाग तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहे. अफगाणिस्तानची पंजशीर व्हॅली बऱ्याच काळापासून तालिबान राजवटीला विरोध करणारा गड आहे. सोव्हिएत युनियनविरुद्ध लढणाऱ्या मुजाहिदीनचे नेते अहमद शाह मसूद यांनी या खोऱ्याला आपला गड बनवला आहे. दोन दशकांपूर्वी जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला तेव्हा पंजशीर खोरे अजूनही पूर्णपणे मुक्त आणि स्वतंत्र होते. तथापि, यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. तालिबान पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. त्यामुळे पंजशीरच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते तालिबानशी स्पर्धा करू शकतील का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

अफगाणिस्तानचा असा प्रांत ज्याला तालिबान घाबरतो; जाणून घ्या सद्यस्थिती
इस्रायलने गाझामध्ये हमासच्या तळावर केला हल्ला

अहमद शाहचा मुलगा करतोय नेतृत्व

पंजशीर खोऱ्यात अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूदने आता तालिबानच्या विरोधात झेंडा उभारला आहे. मात्र, मसूदला त्याच्या वडिलांचा वारसा वगळता कोणतीही मोठी ओळख नाही. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही येथे आश्रय घेतला आहे. पाश्चिमात्य आणि तालिबानविरोधी सरकारांशी जवळीक असलेले लोक मसूदसोबत तालिबानच्या विरोधात युती करण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, असे मानले जाते की पंजशीरमध्ये तालिबान फार काळ स्पर्धा करू शकणार नाहीत. याचे एक कारण म्हणजे तालिबान्यांनी पंजशीरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरातून समर्थन मिळणार नाही

दुसरीकडे, सालेहने तालिबानच्या विरोधात स्थापन होणाऱ्या गटाला मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बंधुत्वाला आवाहन केले आहे. यूएस सीआयए सिक्युरिटी कौन्सिलचे संरक्षण विश्लेषक पॉल डी मिलर म्हणतात की मला असे वाटते की पंजशीर खोऱ्यात तालिबान पंजशीर वाल्यांना आव्हान देऊ शकेल. तथापि, पंजशीर प्रांतवाले अफगाणी आपली स्वायत्तता टिकवून ठेवण्यात असमर्थ आहेत. हा विरोध जर पंजशीर वाल्यांनी कायम ठेवला तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरातून समर्थन मिळणार नाही.

तालीबान पंजशीरला नमवेल

प्रा.हर्ष पंत म्हणतात की तालिबानचा मुकाबला करण्याची क्षमता आता पंजशीरमध्ये नाही. ते म्हणाले की, तालिबान 1990 च्या तुलनेत अधिक मजबूत झाला आहे. अनेक देशांनी त्याला राजनैतिक मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत. पंत म्हणाले की सध्या तालिबानकडे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरसह जड अमेरिकन शस्त्रे आहेत. तालिबान्यांना पाकिस्तानी नक्कीच मदत करतील. भारत, इराण, ताजिकिस्तान आणि काही प्रसंगी अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिल्याने पंजशीर वाचला, परंतु अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यानंतर आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता चीन आणि रशियासारखे देश तालिबानसोबत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com