आता Adani Group बनवणार ड्रोन! 'या' स्टार्टअपसोबत मोठा करार

अदानी समूहाने (Adani Group) विमान वाहतूक उद्योगात (Aviation Industry) आणखी एक मोठा करार केला आहे.
Gautam Adani In Drone Market
Gautam Adani In Drone MarketSaam Tv
Published On

अदानी समूहाने (Adani Group) विमान वाहतूक उद्योगात (Aviation Industry) आणखी एक मोठा करार केला आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises) उपकंपनीने (Subsidiary) कमर्शिअल ड्रोन बनवणाऱ्या बेंगळुरूस्थित स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. (adani defence & aerospace)

50% हिस्सेदारी खरेदी करण्याचा करार;

अदानी समूह हळूहळू संरक्षण क्षेत्रातही (Defense Sector) प्रवेश करत आहे. ग्रुपच्या अदानी डिफेन्स सिस्टीम अँड टेक्नॉलॉजीजने (Adani Defense System & Technologies) ड्रोन निर्मात्या जनरल एरोनॉटिक्समध्ये (General Aeronautics) 50% हिस्सा खरेदी करण्यासाठी एक पक्का करार केला आहे. अदानी डिफेन्सचे सीईओ आशिष राजवंशी यांनी बीएसई फाइलिंगमध्ये माहिती दिली की, या अधिग्रहणामुळे कंपनीची लष्करी UAV क्षमता वाढण्यास मदत होईल.

Gautam Adani In Drone Market
Electric Vehicle : ईलेक्ट्रिक वाहनात अनधिकृत बदल केल्यास होणार कारवाई

शेतीसाठीही काम करणार;

एवढेच नाही तर या करारात लष्करी क्षमतेसाठी काम करण्यासोबतच देशांतर्गत कृषी क्षेत्रासाठी (Agriculture Sector) उपाय विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे. जनरल एरोनॉटिक्स प्रामुख्याने कृषी क्षेत्रासाठीच काम करते. हे रोबोटिक ड्रोन (Robotic Drone) तयार करते जे पिकांचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. यासोबतच ते कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून पिकावर लक्ष ठेवतात.

हा करार 31 जुलैपर्यंत पूर्ण होईल;

कंपन्यांमधील हा करार किती रुपयांत झाला असला तरी कंपनीने याबाबत माहिती दिलेली नाही, मात्र 31 जुलै 2022 पर्यंत हा करार पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, अदानी समूहानेही अलीकडच्या काळात विमान वाहतूक क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने अनेक विमानतळ चालवण्याचे कंत्राट मिळवले आहे. सध्या या कंपनीकडे जयपूर, अहमदाबाद आणि मुंबई येथील विमानतळांसह देशातील प्रमुख विमानतळांच्या संचालनाचे कंत्राट (Airport Operation) आहे.

दरम्यान, अदानी यांच्या ग्रुपने काही दिवसांपूर्वी सिंमेट उद्योगात पाऊल टाकले. त्यांनी जाहीर केले होते की त्यांनी भारतातील Holcim Ltd. चे स्टेक विकत घेण्यासाठी करार केला आहे. अदानी ग्रुपने या कराराची शर्यत जिंकून हा करार 10.5 अब्ज डॉलर म्हणजेच 81 हजार कोटींमध्ये केला. या करारामुळे अदानी ग्रुपने पोर्ट, ऊर्जा क्षेत्रात आपला प्रभाव टाकल्यानंतर सिमेंट क्षेत्र तसेच आता संरक्षण क्षेत्रातही प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com