दुबई - जगातील सर्वात वर्दळीच्या विमानतळांपैकी दुबई Dubai विमानतळ एक आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठा अपघात झाला आहे. विमानतळावरील टॅक्सी वे वरील अपघातात फ्लाय दुबई आणि बहरीनमधील गल्फ एअर या दोन विमान वाहतूक कंपन्यांची विमाने एकमेकांवर आदळली आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही अशी माहिती आहे. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे देखील पहा-
दुबईत विमानतळावर दोन विमानांची टक्कर झाली. या टक्करमध्ये मोठा अपघात टळल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. जगातील सर्वात व्यस्त विमानतळ असलेले दुबई विमानतळ या अपघातानंतर दोन तासांसाठी बंद ठेवावा लागल होते. या अपघातात दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झालेला नाही.
फ्लाय दुबईने या अपघाताविषयी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे बोईंग 737-800 एस हे विमान किर्गिस्तानला जात होते. त्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान समस्या झाली. त्यानंतर दुसऱ्या विमानाने तब्बल सहा तासांनंतर या प्रवाशांना रवाना करण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी प्रशासन आणि फ्लाय दुबई करणार आहेत. दरम्यान, विमान कंपनीने माहिती दिली कि, या अपघातात एअरक्राफ्टचा विंगटिप दुर्घटनाग्रस्त झाला.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.