दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळ्यात आपचे खासदार संजय सिंह यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. याआधी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया ईडीच्या अटकेत आहेत. संजय सिंह यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ईडीच्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना बुधवारी ईडीने कथित दारू घोटाळ्यात अटक केली. रात्रभर ईडीच्या मुख्यालयात ठेवल्यानंतर त्यांना दिल्लीच्या (Delhi) राऊस अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने जर संजय सिंह यांचा फोन जप्त झाला असेल तर कोठडीची गरज का आहे? असा सवाल ईडीसमोर उपस्थित केला.
अटकेला विलंब का?
तसेच तुमच्याकडे संजय सिंह यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना त्यांना अटक करण्यासाठी एवढा वेळ का लागला? तसेच तुम्ही (ईडी) ज्या पैशांच्या व्यवहाराबाबत बोलत आहात, ते जुने प्रकरण आहे, मग अटकेला एवढा विलंब का? असाही महत्वाचा सवाल न्यायालयाने ईडीसमोर उपस्थित केला.
तत्पुर्वी याच घोटाळ्यातील आरोपी आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ ऑक्टोबरला होणार आहे. आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
मनीष सिसोदिया यांची कोणतीही भूमिका नव्हती, तर त्यांना मनी लाँड्रिंगमध्ये आरोपी म्हणून कसे समाविष्ट केले आणि का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारला. तसेच तुमचा युक्तिवाद केवळ अंदाज आहे, तर हे सर्व पुराव्यावर आधारित असावे. अन्यथा न्यायालयात उलटतपासणी झाल्यास हे प्रकरण दोन मिनिटांत कोलमडेल... असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.