Aaditya Thackeray On Eknath Shinde : अटक होईल म्हणून एकनाथ शिंदे घरी येऊन रडले होते, आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!

Aaditya Thackeray's Big Secret Explosion: हैदराबाद येथे एका मुलाखतीदरम्यान बोलताना आदित्य ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
Aaditya Thackeray Big Secret Explosion About CM Eknath Shinde
Aaditya Thackeray Big Secret Explosion About CM Eknath Shindesaam tv
Published On

Aaditya Thackeray Big Secret Explosion About CM Eknath Shinde : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. चाळीस आमदार हे फक्त पैशांसाठी आणि त्यांच्या जागेसाठी गेलेत.

सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. आपण भाजपसोबत जाऊया नाहीतर मला अटक होईल असे ते घरी येऊन म्हणाले होते असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हैदराबाद येथे एका मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

Aaditya Thackeray Big Secret Explosion About CM Eknath Shinde
ICC T20I Rankings: तो अजूनही 'SKY'च! खराब फॉर्मात असूनही सूर्यकुमार टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी कायम

या मुलाखतीदरम्यान एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरे यांना सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरेंसोबत होते तेव्हा ते चांगले होते आणि आता केवळ भाजपसोबत गेले म्हणून वाईट झाले असे का? असा प्रश्न विचारला. तसेच ते तर सध्या बाळासाहेबांचा मूळ विचारांनुसार चालत असल्याचा दावा देखील करत आहेत. मग ते चुकीचे आणि वाईट कसे असे देखील विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांना हा गौप्यस्फोट केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, हे चाळीस आमदार केवळ पैशांसाठी आणि त्यांच्या जागेसाठी गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री घरी येऊन रडले होते. आपण भाजपसोबत जाऊया नाहीतर मला अटक होईल असे ते म्हणाले होते असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, हे त्यांचं नशीब आहे की, त्यांना निर्दोष आणि मूळ शिवसेना म्हणत मुख्यमंत्री केले गेले. पण त्यामुळे त्यांनी आमचा केलेले विश्वासघात आणि आम्ही त्यांना एवढं सगळं दिल्यानंतर त्यांनी पाठीत खुपसलेला खंजीर हे आमच्यासाठी गद्दारीच आहे. (Latest Political News)

Aaditya Thackeray Big Secret Explosion About CM Eknath Shinde
Rahul Gandhi News: राहुल गांधी अडचणीत; फौजदारी तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

पुढे बोलताना ते म्हणाले, तुम्ही माझ्या आजोबांच्या हिंदुत्वाबद्दल आणि विचारांबद्दल बोलत असाल तर मला भाजपने व्हॉट्सअॅप यूनिवर्सिटीतून पसरवलेल्या माहितीपेक्षा थोडं जास्तच माहिती आहे. माझ्या आजोबांनी याआधी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यांचे गांधी परिवारासोबत चांगले रिलेशन होते. त्याने जाहीरित्या काँग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता.

ईडी-सीबीआयच्या भीतीने 'ते' भाजपकडे गेले : अंधारे

ज्या-ज्या लोकांच्या ईडी आणि सीबीआयच्या फायली तयार होत्या, ते सगळे भीतीने भाजपला जाऊन मिळाले. शिवसेनेतून फुटून गेलेले याच भीतीपोटी गेले, या आदित्य ठाकरे यांच्या मताशी सहमत होत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी परत एकदा शिंदे गटावर टीका केली. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा दाखल देत ही गद्दारीच असल्याचेही त्या म्हणाल्या. चंद्रपुरात एका सामाजिक कार्यक्रमासाठी आल्या असताना त्या माध्यमांशी बोलत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com