भारतात कोरोना, डेल्टा प्लस नंतर कप्पा व्हेरिएंट; जाणून घ्या लक्षणे

देशातील कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. असे असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचं आणखी एक मोठ संकट समोर आलं आहे.
भारतात कोरोना, डेल्टा प्लस नंतर कप्पा व्हेरिएंट; जाणून घ्या लक्षणे
भारतात कोरोना, डेल्टा प्लस नंतर कप्पा व्हेरिएंट; जाणून घ्या लक्षणेSaam Tv
Published On

उत्तर प्रदेश: कोरोनासारख्या Corona महामारीचा गेल्या वर्षीपासून भारत India देश सामना करत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट Second Wave काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. असे असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचं आणखी एक मोठ संकट समोर आलं आहे. त्यामुळे मात्र आता पुन्हा एकदा भारतासमोरील चिंता वाढणार असल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये Uttar Pradesh कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. आता कोरोनाचा कप्पा Kappa नावाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. A new kappa variant of Corona has been found in Uttar Pradesh

हे देखील पहा-

उत्तर प्रदेशमध्ये कप्पा व्हेरिएंट :

गोरखपूर Gorakhpur आणि देवरियामध्ये डेल्टा प्लसचे Delta Plus दोन प्रकरण आढळून आले होते. आता संत कबीर नगरमध्ये एक रुग्ण कोरोनाच्या कप्पा स्ट्रेन Kappa Strain पॉझिटिव्ह सापडला आहे. एका 66 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे जीनोम सिक्वेंसींग अभ्यासादरम्यान या स्ट्रेनबद्दल समजून आलं.

कप्पा व्हेरिएंटची लक्षण :

कोरोना व्हायरसच्या कप्पा व्हेरिएंटमध्ये खोकला, ताप, घसा खवखवणे यासारखी प्राथमिक Primary लक्षणे आढळून येतात. तसेच इतर सौम्य आणि गंभीर लक्षणंही कोरोना व्हायरससारखीच आढळून येतात असे तज्ज्ञांनी Experts सांगितलं आहे. तसेच या व्हेरिएंटबद्दल अद्याप अधिक संशोधन सुरु आहे. त्यामुळे या व्हायरस संबंधीत बरीच माहिती अजून समोर येण्याची शक्यता आहे.

भारतात कोरोना, डेल्टा प्लस नंतर कप्पा व्हेरिएंट; जाणून घ्या लक्षणे
संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य... (पहा व्हिडीओ)

कसा कराल या व्हेरिएंटपासून बचाव :

कप्पा व्हेरिएंट ते डेल्टा व्हेरिएंटपासून Variant बचाव करायचा असेल तर मास्क Face Mask वापरणं हा एकमेव उपाय असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. आवश्यकते असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि सार्वजनिक ठिकाणी Public places लोकांपासून अंतर ठेवा. वेळोवेळी आपले हात धुवा Hand Wash. आपल्या प्रतिकारशक्तीवर Immunity विशेष लक्ष द्या.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com