धक्कादायक! दारुड्या पित्याने 13 महिन्याच्या मुलाला फेकलं नदीत, कारण...

बिहारच्या (Bihar) बेगूसराय जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. एका मद्यपी पित्याने आपल्या 13 महिन्यांच्या मुलाला नदीत फेकून दिले आहे.
धक्कादायक! दारुड्या पित्याने 13 महिन्याच्या मुलाला फेकलं नदीत, कारण...
धक्कादायक! दारुड्या पित्याने 13 महिन्याच्या मुलाला फेकलं नदीत, कारण...Saam Tv

बिहार: बिहारच्या (Bihar) बेगूसराय जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. एका मद्यपी पित्याने आपल्या 13 महिन्यांच्या मुलाला नदीत फेकून दिले आहे. बिहारच्या भगवानपूर पोलीस स्टेशन हद्दीत बनवारीपूर गावात एका निर्दयी जन्मदात्याने आपल्या निष्पाप बाळाची हत्या केली आहे.देखील

हे देखील पहा-

मनीष कुमार असे आरोपी पित्याचे नाव आहे. त्याने आपल्या 13 महिन्यांचा निष्पाप बाळ शिवमला बलान नदीत फेकून दिले आणि त्यामुळे त्या बाळाचा बुडून मृत्यू झाला आहे. वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना रविवारी संध्याकाळी घडली.

तर, अवघ्या 13 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आहे. बापाने आपल्याच मुलाची हत्या केली यावर लोकांचा विश्वास बसत नाही आहे. तर, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून पोस्टमॉर्टमनंतर मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

धक्कादायक! दारुड्या पित्याने 13 महिन्याच्या मुलाला फेकलं नदीत, कारण...
गुजरात: 400 कोटी रुपयांचे हेरॉईन किनार्‍याजवळ जप्त; 6 तस्करांना अटक

कारण काय ?

या घटनेबाबत वृत्तानुसार सांगितलं जात आहे की, गावातील रहिवासी मनीष चौरसिया यांचा पत्नी कांचन देवीसोबत तिच्या माहेरी जाण्यावरून वाद सुरु होता. त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात आपल्या 13 महिन्याचा मुलगा शिवम कुमारला घराजवळ असलेल्या बलान नदीमध्ये फेकून दिले. पुढे मुलाची आईने सांगितलं की, रविवारी संध्याकाळी ती माहेरी जाण्याच्या तयारीत होती. यानंतर दारूच्या नशेत तेथे आला आणि पतीने तिला माहेरी जाण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि यानंतर तिचा पती रागावला आणि मुलासह निघून गेला.

त्यानंतर काही वेळाने मुलगा कुठे आहे याबद्दल विचारणा केली असता, तो बोटीवर फिरत असल्याचं त्यानं सांगितले. त्यानंतर बोटीवर शोध घेऊनही शिवम कुठेच सापडला नाही, तेव्हा संशय आला. यानंतर आजूबाजूच्या लोकांसह मुलाचा शोध घेतला. त्यानंतर त्याचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला होता.

पोलिसांनी घटनास्थळ गेले आणि आरोपीला अटक केली. त्यानंतर चौकशी केली असता, त्याने मुलाला नदीत फेकून दिले आहे असे मान्य केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com