गुजरात: 400 कोटी रुपयांचे हेरॉईन किनार्‍याजवळ जप्त; 6 तस्करांना अटक

गुजरातमध्ये (Gujrat) भारतीय तटरक्षकदल आणि गुजरात एटीएसने (ATS) संयुक्त कारवाईत तब्बल 400 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले आहे.
गुजरात: 400 कोटी रुपयांचे हेरॉईन किनार्‍याजवळ जप्त; 6 तस्करांना अटक
गुजरात: 400 कोटी रुपयांचे हेरॉईन किनार्‍याजवळ जप्त; 6 तस्करांना अटकSaam Tv

गांधीनगर : गुजरातमध्ये (Gujrat) भारतीय तटरक्षकदल आणि गुजरात एटीएसने (ATS) संयुक्त कारवाईत तब्बल 400 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले आहे. या कारवाईत भारताच्या जल हद्दीत 6 चालकांसह पाकिस्तानी नाव (Boat) ताब्यात घेण्यात आली आहे. अल हुसैनी ( Al Huseini) ही पाकिस्तानी (Pakistan) बोट ताब्यात घेतली आहे.

किनाऱ्यालगत गस्त घालत असताना अधिकाऱ्यांना गुजरात किनारपट्टीजवळ एक पाकिस्तानी नाव दिसून आली. तसेच असलेल्या सहा संशयितांना अटक केली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून 77 किलो हेरॉइन (Heroin) जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत 400 कोटी रुपये इतकी आहे अशी माहिती मिळत आहे.

गुजरात एटीएसच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान पूर्वी काश्मीर आणि पंजाबमधून भारतात ड्रग्ज पाठवत असे, मात्र काही काळापासून काश्मीर आणि पंजाबमध्ये कडक कारवाई केल्यानंतर आता पाकिस्तान समुद्रमार्गे भारतात ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.

गुजरात: 400 कोटी रुपयांचे हेरॉईन किनार्‍याजवळ जप्त; 6 तस्करांना अटक
Breaking: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीचे समन्स ! "या" प्रकरणी नाव समोर

गुजरात एटीएसच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानमधून बहुतांश ड्रग्ज पाकिस्तानमार्गे भारतात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक मच्छिमारांना काही वेळा पैशाचे आमिष दाखवून आंतरराष्ट्रीय सीमेजवळून समुद्रात अमली पदार्थ पाठवले जातात, ते गुजरातमध्ये आणल्यानंतर देशातील विविध मालवाहतूक करून दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरात पाठवले जातात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com