Viral Video: मस्ती आली अंगाशी! चालू गाडीवरचं सुरू होता रोमान्स, पोलिसांनी घडवली अद्दल; Video Viral

सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Viral Video
Viral Video

Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून कधी कधी भितीने थरकाप उडतो, तर कधी रागही येतो. सध्या अशाच एका व्हिडिओची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. एका प्रेमी युगूलाचा हा व्हिडिओ असून दोघेही चक्क चालू गाडीवर रोमान्स करताना दिसत आहेत. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागाील सत्य, चला जाणून घेवू... (Viral Video)

Viral Video
Viral Video: मित्राचं लग्न म्हणून नाच नाच नाचला अन् अचानक खाली कोसळला, तरुणाच्या मृत्यूने हळहळ

सध्या सोशल मीडियावर एका युवक -युवतीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर गाड्यांची प्रचंड गर्दी असतानाच एक युवक तरुणीला मांडीवर बसवून गाडी चालवताना दिसत आहे. सोबतच ही तरुणी तरुणाला मिठी मारत चालू गाडीवरचं रोमान्स करताना दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडिओ उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमधील आहे. तर विकी असे या तरुणाचे नाव आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचसोबत स्वतःचा जीव धोक्यात घालू नका असा सल्लाही दिला आहे.

Viral Video
PM Narendra Modi in Mumbai : ...म्हणून माेदीसाहेब मुंबईला येताहेत : भास्कर जाधव

पोलिसांनी केली कारवाई..

या व्हायरल व्हिडिओवर कारवाई करताना लखनौ पोलिसांनी बुधवारी म्हणजेच आज या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी कलम 294,279 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. आणि स्कूटीही पोलिसांनी जप्त केली आहे.

त्याचबरोबर स्कूटी चालवणाऱ्या विक्कीवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विकीच्या वडिलांचे नाव विषंभर असून तो चिन्हाट भागातील रहिवासी आहे. त्याचवेळी गाडीवरील मुलगी अल्पवयीन असल्याचीही माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान, या आधीही अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे अशा तरुणांवर कठोर कारवाईची मागणी नेटकऱ्यांमधून होत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com