काबुल मधून दिल्लीकडे उड्डाण घेताच प्रवाश्यांनी केला भारत मातेचा जयजयकार (पहा व्हिडिओ)

भारतीय हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी अफगाणिस्तानच्या काबूल येथून उड्डाण घेतली आहे.
काबुल मधून दिल्लीकडे उड्डाण घेताच प्रवाश्यांनी केला भारत मातेचा जयजयकार
काबुल मधून दिल्लीकडे उड्डाण घेताच प्रवाश्यांनी केला भारत मातेचा जयजयकारTwitter/@ANI

काबुलहून Kabul भारताकडे एअर इंडियाचे Air India विमान 1956 ताजिकिस्तानहून 87 भारतीयांना घेऊन नवी दिल्ली Delhi येते दाखल झाले आहे. यात दोन नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. या २ नेपाळी नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आले आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथील आपल्या दूतावासातुन  मदत घेण्यात आली.

काबुल मधून त्यांना दुशान्बे येथे आणले आणि दुशान्बे एअरपोर्टवरून  एअर  इंडियाचे विमान दिल्लीत दाखल झाले  आहेत. विमानाने उड्डाण घेताच विमानात उपस्थित भारतीयांनी भारत माता की जय म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 

अफगाणिस्तानातील भारतीय नारीकांना काबुल विमानतळावरुन अपहरण केल्यानंतर संबंध देशात मोठ्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर ते सुखरूप असल्याची माहिती समोर आल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला होता.

त्यातच आता देशासाठी अजुन एक सकारात्मक बातमी आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी अफगाणिस्तानच्या काबूल येथून उड्डाण घेतली आहे. या विमानात १६८ भारतीय नागरिक आहेत. हे युपीच्या गाझियाबादमधील भारतीय हवाई दलाच्या  हिंडन  विमानतळावर  उतरणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com