Delhi News : 8 वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला, १० मिनिटं निघून गेली अन् मग...

सुमारे 10 मिनिटे हा मुलगा लिफ्टमध्ये अडकला होता.
Delhi News
Delhi NewsSaam Tv
Published On

Delhi News : देशभरात अनेक ठिकाणी लिफ्ट अपघातांच्या घटना वारंवार पुढे येतात. आताही अशीच एक घटना ग्रेटर नोएडामधून (Delhi) समोर आली आहे. ग्रेटर नोएडाच्या बिसराखमध्ये एक 8 वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली आहे. सुमारे 10 मिनिटे हा मुलगा लिफ्टमध्ये अडकला होता.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. अशा परिस्थितीत मुलाने अनेकवेळा मदतीसाठी हाक मारली आणि मदतीसाठी इमर्जन्सी बटणही दाबले, परंतु तरीही मुलाला मदत मिळू शकली नाही. लिफ्टमधून जात असताना चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर लिफ्टचा दरवाचा अचानक उघडला आणि लिफ्ट बंद पडली. त्यामुळे हा मुलगा लिफ्टमध्येच अडकला.

Delhi News
Satara Pune Highway : साता-याहून पुण्याला जाणा-या वाहतूकीच्या मार्गात ३१ डिसेंबरपर्यंत माेठा बदल; जाणून घ्या कारण

हा मुलगा लिफ्टमध्ये एकटाच होता. त्यामुळे लिफ्ट बंद पडल्यानंतर तो चांगलाच घाबरला. पाचव्या मजल्यावर राहणारा रहिवासी लिफ्टजवळ गेला तेव्हा त्याला आतून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी सुरक्षारक्षकाला बोलावले. त्यानंतर तब्बल दहा मिनिटांनी रहिवाशांच्या मदतीने या मुलाला बाहेर काढणायत आले. ही संपूर्ण घटना इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com