अबब! 78 वेळा कोरोना पॉझिटिव्ह, एक वर्षापासून क्वारंटाईन! डॉक्टरांनी सांगितलं कारण...

कोरोना काळात एकदा कोरोना होऊन गेला तरी पुन्हा त्याचा संसर्ग झाल्याची बरीच प्रकरणे समोर आली आहेत. पण तुम्हाला फक्त ऐकूनच आश्चर्य वाटेल की, एका व्यक्तीला एकदा, दोनदा नाही तर तब्बल 78 वेळा कोरोना झाला आहे.
78 Times Corona Positive
78 Times Corona PositiveSaam Tv
Published On

अंकारा : कोरोनाचे निदान झालं तरी माणूस भीतीने कापू लागतो. कोरोना काळात एकदा कोरोना होऊन गेला तरी पुन्हा त्याचा संसर्ग झाल्याची बरीच प्रकरणे समोर आली आहेत. पण तुम्हाला फक्त ऐकूनच आश्चर्य वाटेल की, एका व्यक्तीला एकदा, दोनदा नाही तर तब्बल 78 वेळा कोरोना झाला आहे. तुर्कस्तानातील (Turkey) ही व्यक्ती गेल्या 14 महिन्यांत 78 वेळा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. वर्षभरापासून ती रुग्णालयातच क्वारंटाईन आहे. (78 Times Corona Positive)

वृत्तानुसार, 56 वर्षांचा मुझफ्फर कायासन नोव्हेंबर 2020 साली त्याला पहिल्यांदा कोरोना झाला होता. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्याच्यातील लक्षणे देखील कमी झाली. पण जेव्हा पुन्हा कोरोना टेस्ट केली तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह (Negative Corona Report) आला नाही.

78 Times Corona Positive
India Corona Update: कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट, 24 तासांत 67,084 नवीन रुग्णांची नोंद, 1241 मृत्यू

हे वाचून धक्का बसेल की, तब्बल 78 वेळा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पण प्रत्येक वेळेस त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हच येत आहे. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा आयसोलेशनमध्ये (Isolation) जातात. यामुळे त्यांना ना आपल्या मित्रमैत्रिणींना भेटता येत ना ते कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. ते खिडकीतूनच आपल्या कुटुंबासोबत थोडा संवाद साधतात. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नसल्याने ते कोरोना लसही (Corona Vaccine) घेऊ शकले नाहीत.

हे देखील पहा-

या रुग्णाला ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर (Blood Cancer) आहे. ज्यामध्ये आजारांशी लढणाऱ्या व्हाइड ब्लड सेल्स (WBC) म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात. तसेच रुग्णाची इम्युनिटी (Immunity Power) कमी होऊ लागते. डॉक्टरांनी सांगितलं यामुळेच कायासनच्या रक्तातील कोरोनाव्हायरस नष्ट होत नाही आहे. सध्या त्यांना रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी औषध देणे सुरु आहे. जात आहे पण ही प्रक्रिया खूप मोठी आहे. त्यामुळे जगात पाहिलांदाच एक प्रकरण समोर आले आहे ज्यात रुग्ण इतक्या कालावधीपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com