Colombia Landslide : कोलंबियात भूस्खलन होऊन ३३ जण ठार तर अनेक जण जखमी; तीन दिवसांनंतरही मृतदेह काढण्याचे काम सुरु

महामार्गावर भूस्खलन होऊन ३३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Colombia Landslide
Colombia Landslide Saam TV

Colombia News: कोलंबियामधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. महामार्गावर भूस्खलन होऊन ३३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच अनेक व्यक्ती यात जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. जखमी व्यक्तींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रिसारल्डा येथील पश्चिम-मध्य विभागातील परेरा-क्विब्डो महामार्गावर एक बस जात होती. ही बस कॅलीहून कोंडोटोच्या दिशेने प्रवाशांना घेऊन निघाली होती. तसेच रस्त्यावर काही दुचाकी आणि चारचाकी देखील होत्या. अचानक रत्यावर भूस्खलन झाल्याने नागरिकांची एकच धांदळ उडाली. सर्वजण जीव मुठीत घेऊन पळू लागले.

गृहमंत्री अल्फोन्सो प्राडा यांनी या घटनेबाबत सोमवारी सांगितले की, आता पर्यंत या दुर्घटनेत ३ लाहान मुलं आणि ३३ जणांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. तेसच ९ जणांना वाचवण्यात यश आले आहे. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटना घडताच या ठिकाणी कोलंबियाच्या रिस्क मॅनेजमेंट युनिटमचे कर्मचारी, पोलिस, लष्कर आणि वाहतूक मंत्रालयाच्या ट्रान्झिट अँड ट्रान्सपोर्टेशन डायरेक्टरेट यांनी बचावासाठी धाव घेतली.

तसेच भूस्खलनाची (Landslide) ही घटना पाहता सर्व नागरिकांना सावधानीचा इशारा देण्यात आला आहे. या पुढे आणखीन काही दिवस हवेत ओलावा असल्याने अशा घटना घडण्याची शक्यता असल्याचे सांगत प्राडा यांनी हाय अलर्ट जारी केला.

Colombia Landslide
LandSlide In Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनात १३ ठार, १० बेपत्ता

अपघात झालेला रस्ता फार जुना होता. त्यामुळे त्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र गाळ जास्त असल्याने सर्वच व्यक्तींचा शोध घेणे थोडे गुंतागुंतीचे आहे, असे रिसराल्डाचे गव्हर्नर व्हिक्टर मॅन्युएल तामायो यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Colombia Landslide
Colombia : कोलंबियामध्ये भीषण अपघात, झुंज सुरु असताना स्टेडियमचा स्टँड कोसळला | SAAM TV

हवामान प्रतिकूल स्थितीत असताना रस्ते (Road) निश्चित करण्यासाठी अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी राजधानी बोगोटा येथे नॅशनल युनिफाइड कमांड पोस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com