आंध्रप्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील २४ मंत्र्यांनी दिले राजीनामे

Jagan Mohan Reddy: आंध्रप्रदेशमध्ये 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याअगोदर हा मोठा बदल करण्यात आला आहे.
Jagan Mohan Reddy
Jagan Mohan ReddySaam Tv
Published On

आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या मंत्रीमंडळातील २४ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. आंध्रप्रदेशमध्ये 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याअगोदर हा मोठा बदल करण्यात आला आहे. आज गुरुवारी, एकूण 24 मंत्र्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. मुख्यमंत्री रेड्डी पूर्ण मंत्रिमंडळ बदलणार असल्याची चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर हे राजीनामे घेण्यात आले आहेत.

गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. जगन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांचा हा निर्णय आंध्रप्रदेशमध्ये 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुसाठी असल्याच्या बोलले जात आहे. या मंत्र्यांनी 8 जून 2019 रोजी मंत्री पदाची शपथ घेतली होती. हे मंत्री 8 डिसेंबर 2021 पर्यंत पदावर राहणार होते. पण कोरोनामुळे मंत्रिमंडळाचे विस्तारीकरण पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जाते.

९ एप्रिलला नवे मंत्री घेणार शपथ

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी बुधवारी सायंकाळी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिमंडळातील बदलांची माहिती दिली आहे. ते गुरुवारी पुन्हा राज्यपालांची भेट घेऊन नव्या मंत्र्यांची यादी सादर करणार आहेत. नवं मंत्रीमंडळ ९ एप्रिलला शपथ घेणार आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com