
नवी दिल्ली: तालिबान्यांनी आज सकाळी 150 भारतीयांचे अपहरण केल्याच्या वृत्ताला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या भारतीय नागरिकांना सोडण्यात आले आहे.आणि ते आता सुरक्षित काबूल विमानतळाच्या आत आहेत. आणि त्यांना लवकरच युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधून विमानातून बाहेर काढले जाईल.
भारतीयांचे अपहरण करण्यात आल्याच्या स्थानिक माध्यमांच्या अहवालानंतर एका उच्च सरकारी सूत्राने सांगितले की, काबूल विमानतळाबाहेर फ्लाइटसाठी वाट पाहणाऱ्या भारतीय नागरिकांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी आणि प्रवासाची कागदपत्रे पडताळणीसाठी नेण्यात आले होते. असेही सांगितले की, भारतीयांना कोणताही धोका नाही.
दरम्यान, काही वेळापूर्वी अहवालानुसार सुमारे 150 लोकांचे अपहरण काबुल विमानतळावरून करण्यात आल्याचे वृत्त होते. यातील बहुतेक लोक भारतीय असल्याचे सांगितले जात होते. काबूल विमानतळाजवळ या लोकांचे अपहरण करण्यात आलंय अशी माहिती होती. काबुलस्थित न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर शरीफ हसन यांनी तालिबानच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की, तालिबान्यांनी भारतीय नागरिकांचे अपहरण केल्याचा तो दावा फेटाळून लावला आहे.
दरम्यान, यावर आता तालिबान कडून स्पष्टीकरण देण्यात आल होत कि, आम्ही 150 भारतीयांचं अपहरण केलं नाही तर विमानतळाच्या आत सुरक्षितरित्या त्यांना नेण्यात आलय. तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वसेक यांनी या वृत्ताच खंडन केल होत.
काबुलमधील स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, कागदपत्र पडताळणीसाठी नेट असताना त्यांनी भारतीयांना विमानतळाजवळील गॅरेजमध्ये ठेवण्यात आले होते.
दरम्यान, C130J विमानाने 85 भारतीयांसह उड्डाण केले आहे. 85 भारतीयांना घेऊन ताजिकिस्तानमध्ये उतरल्याची माहिती आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.