Pune News: सावधान! झिपलाईनिंग करतायत? क्षणाचं धाडस बेतेल जीवावर झिपलाईनिंगनं आयुष्य संपलं...!

Adventure Gone Wrong: पुण्यातील तरुणीला झिपलायनिंग हा साहसी खेळ भोवलाय. कुटुंबासोबत वॉटर पार्कमध्ये फिरायला गेलेल्या तरुणीच्या एका चूकीने तिच्या कुटुंबावर दुखांचा डोंगर कोसळल्या. नेमकं या तरुणीसोबत काय झालं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
pune news
pune news saam tv
Published On

ये जिंदगी न मिलेगी दोबारा' असं म्हणत तरुणाई काहीतरी थ्रिलींग करण्याच्या मागे नेहमीच असते...कधी वेडं धाडसं म्हणून तर कधी सोशल मिडीयाच्या लाईक्ससाठी तरुणाई जीव धोक्यात घालते. असाच प्रकार पुण्यातल्या तरुणीसोबत घडलायं....पुण्यातल्या वॉटर पार्कमध्ये तरल अटपाळकर ही आपल्या कुटुंबासोबत फिरायला आली होती. काहीतरी धाडसी करायचं म्हणून तिनं झिपलायनिंग करण्याचं ठरवलं आणि नियतीनं तिथेच घात केला... झिपलायनिंगवेळी रोपवर असताना तरलनं सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोप रेलिंग न झाल्यानं तरल लोखंडी स्टूलवर उभी राहीली.. जमिनीपासून हे अंतर 30 फुटांचं होतं....दुर्दैवानं स्टूलवरुन तरलचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाला...

तरलच्या मृत्यूनंतर आता अनेक सवाल उपस्थित झालेत. रिसॉर्टवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मुळातच झिपलाईन सारखे साहसी खेळ रिसॉर्टमध्ये ठेवण्याची रितसर परवानगी आहे का? त्यासाठी रिसॉर्टनं सुरक्षेची सर्व खबरदारी घेतली होती का? याची चौकशी होणं गरजेचंय.

यासह असे साहसी खेळ असलेल्या सगळ्याच रिसॉर्टची तपासणी होणं गरजेचंय.त्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही जात असाल तर स्वतःची काळजी घ्या...नसतं धाडस करु नका....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com