Pune : पुण्यात कोयत्याची दहशत संपेना, सिंहगडाच्या पायथ्याशी तरूणावर कोयत्याने सपासप वार

Pune Crime News : सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीमध्ये एका तरुणावर कोयत्याने हल्ला झालाय. पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Sinhagad Foot Hills Witness Another Machete Attack Amid Law and Order Crisis in Pune
Pune CrimeSaam Tv
Published On

Latest Pune News : पुण्यात कोयत्याची दहशत काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. सिंहगडाच्या पायथ्याशीच एका तरूणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, पोलिसांची मटणाची पार्टी सुरू होती, त्यापासून काही अंतरावरच तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. वारंवार होणाऱ्या कोयत्याच्या हल्ल्यामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीमध्ये एका तरुणावर कोयत्याने हल्ला झालाय. हवेली पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांची मटण पार्टी सुरू होती. तेथून काही अंतरावर तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झालाय. त्यामुळे सिंहगड परिसरातील घटनेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल कऱण्यात आला असून तपास सुरू आहे.

Sinhagad Foot Hills Witness Another Machete Attack Amid Law and Order Crisis in Pune
Pune : शिवाजीनगर बसस्थानकाला अखेर मुहूर्त, ४५० कोटींचं बजेट अन् १६ मजली इमारत, भूमिपूजनाची तारीखही ठरली

सिंहगडाच्या पायथ्याशी आतकरवाडी येथे एका हॉटेलमध्ये रात्री हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पार्टी सुरु होती. तेथून काही अंतरावर तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तरूणाच्या हातावर,पायावर,डोक्यावर खोल जखमा झाल्या आहेत. तरूणावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Sinhagad Foot Hills Witness Another Machete Attack Amid Law and Order Crisis in Pune
Crime : 16 हजारांचा पगार अन् क्लर्ककडे बीएमडब्ल्यू कार, 16 लाखांचा गॉगल

मागील काही दिवसांपासून हवेली पोलीस स्टेशन हद्दीत अत्यंत गंभीर गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. तरुणावर कोयत्याने वार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून जवळ सुरू असलेल्या पार्टीतील पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर हा हल्ला झाला नसता, असे म्हटले जात आहे. पुण्यात गावगुंडाच्या दहशतीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे.

Sinhagad Foot Hills Witness Another Machete Attack Amid Law and Order Crisis in Pune
Crime : वहिनीला एकटं पाहून दीराचा संयम सुटला, बलात्कार केला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com