Indrayani River
Indrayani Riverदिलीप कांबळे

दुर्दैवी : वाढदिवशीच लावली नदी पार करण्याची पैज; 'तो' परतलाच नाही

वाढदिवस साजरा करत असताना मित्रांची नदीपात्र ओलंडण्याची पैज लागली होती. पुर्णा नदीपात्र ओलांडून पुन्हा परत येत असताना मध्ये दमछाक झाल्याने संतोषला आपले प्राण मात्र गमवावे लागले.
Published on

मावळ : मावळ (Maval) मधील तळेगाव दाभाडेजवळ असलेल्या वराळे गावाजवळील इंद्रायणी नदी परिसरांत वाढदिवस साजरा करायला आलेल्या एक तरूण रविवारी दुपारी इंद्रायणी नदीपात्रात (Indrayani River) बुडाला असुन तब्बल पंचवीस तासाच्या अथक परीश्रमानंतर त्याचे शव मिळालं आहे.

या तरुणाच नाव संतोष जाधव वय वर्ष २५ असून तो मुळचा लातूर येथील असुन वराळे गावच्या नदी किनारी वाढदिवस साजरा करत असताना मित्रांची नदीपात्र ओलंडण्याची पैज लागली होती. पुर्णा नदीपात्र ओलांडून पुन्हा परत येत असताना मध्ये दमछाक झाल्याने संतोषला आपले प्राण मात्र गमवावे लागले.

Indrayani River
Satara Breaking News: गुणरत्न सदावर्तेंची न्यायालयीन काेठडीत रवानगी

सदर घटनेची माहिती मिळताच वन्यजीव मावळ रेस्कु संस्था आणि शिवदुर्ग रेस्कु पथक घटनास्थळी दाखल झाले रविवार दि १७ रोजी सायं सात वाजेपर्यंत शोधमोहिम सुरू होती त्यानंतर सोमवारी पुन्हा सकाळी नऊ वाजल्यापासुन पुन्हा शोधमोहिम सुरू केली अथक परीश्रमानंतर आज सायं चार च्या सुमारास बॅाडी शोधण्यास यश आले असून अधिकचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade Police) करीत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com