मुंबई: १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. सोबतच चांदीवाल आयोगोकडून सचिन वाझे यांचीही चौकशी सुरु आहे. सचिन वाझेने उलट तपासणीवेळी चांदीवाल आयोगाला सांगितलं होतं की, अनिल देशमुख यांनी त्याला बार आणि आस्थापनांकडून वसुलीचे आदेश दिले नव्हते, मात्र आता त्याने केलेल्या अर्जात हो मला देशमुखांनी (Anil Deshmukh) वसुलीचे आदेश दिले होते, असं उत्तर नोंदवण्याची मागणी केली होती. मात्र वाझेचा हा अर्ज चांदिवाल आयोगाने फेटाळला आहे. सचिन वाझेने (Sachin Waze) अर्जात असंही म्हटलेलं आहे की, देशमुखांच्या सहकाऱ्यांनी मला वसुलीसंदर्भात सूचना केल्या होत्या. (100 Crore Recovery Case: "Yes, Deshmukh had ordered me to recover Rs 100 crore" - Sachin Waze)
हे देखील पहा -
सचिन वाझेचा चांदीवाल आयोगासमोर अर्ज-
मला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आल्यापासून मला गरजेच्या बेसिक मेडिकल गोष्टी पुरवल्या नाहीत. मला गोरेगावच्या केसमध्ये गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रचंड मानसिक त्रास दिला. देशमुख हे पावरफुल व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही माझ्यावर त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर दबाव टाकून मानसिक त्रास देणाऱ्यांची नावे मी घेणार नाही, कारण मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होईल. माझं अँजिओप्लास्टी ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा मला बेसिक मेडिकल ट्रीटमेंट देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मला आणि परमबीर सिंग (Parambir Singh) यांना खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.