Aaditya Thackeray : राज्यातील रखडलेल्या प्रकल्पाला शिंदे सरकार जबाबदार; आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर हल्लाबोल सुरुच आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडूनही शिंदे सरकारला टार्गेट करणे सुरूच आहे.
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Saam Tv

निवृत्ती बाबर

Aaditya Thackeray News : ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर हल्लाबोल सुरुच आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडूनही शिंदे सरकारला टार्गेट करणे सुरूच आहे. याचदरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना शिंदे सरकारला जबाबदार धरलं आहे. (Latest Marathi News)

Aaditya Thackeray
Shivsena Political Crisis : शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार कोणाचं पारडं जड? ठाकरे गट की शिंदे गट?

वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना शिंदे सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे की, '2022 च्या मध्यात सरकारमध्ये झालेल्या विश्वासघाताने आणि बदलामुळे, विद्यमान सरकारकडून लोकहिताचे अनेक प्रकल्प रखडलेले आपण पाहिले आहेत'.

'पाणी आणि मुंबईची (Mumbai) मान्सून अवलंबित्व ही एक प्रमुख समस्या आहे, जी आम्ही महाविकास आघाडी म्हणून हाताळण्याचा प्रयत्न करत होतो. हवामानातील बदल, मुंबई हवामान आणि सतत वाढणारी लोकसंख्या यामुळे आपल्याला पाण्याचे पर्यायी स्रोत हवे आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी पुढे लिहिले.

'2022 च्या मध्यात तुम्ही दिलेली माहिती लक्षात असेल, ऑक्टोबर 2022 पर्यंत, प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प भूमिपूजनासाठी तयार होतील आणि या वर्षाच्या मध्यापर्यंत, डिसेलिनेशन प्लांट भूमिपूजनसाठी तयार होईल, असेही त्यांनी लिहिले.

Aaditya Thackeray
Government Job Alert : तरुणांसाठी खुशखबर! राज्य सरकार 'या' विभागात ४०००० पदांची भरती करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

'एसटीपीमुळे मुंबईतील जवळपास 2790 एमएलडी पाणी पिण्यायोग्य नसलेल्या वापरात परत येईल, तर डिसॅलिनेशन 40 एमएलडी आपल्या शहरात आणेल. या स्मरणपत्राद्वारे, मला या प्रकल्पांची स्थिती आणि STP च्या कामांना 5 महिने उशीर का झाला, हे जाणून घ्यायचे आहे, अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी इकबाल सिंह चहल यांना पत्रातून केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com