पीएफ विम्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीकडून धरणे आंदोलन

पुण्यातील उरावडे MIDC येथील SVS एकवा कंपनीतील अग्निकांडात दगावलेल्या 17 कामगारांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून न्याय मिळावा यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
पीएफ विम्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीकडून धरणे आंदोलन
पीएफ विम्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीकडून धरणे आंदोलनगोपाल मोटघरे
Published On

पुणे : पुण्यातील उरावडे MIDC येथील SVS एकवा (SVS Aqua Technologies) कंपनीत घडलेल्या अग्निकांडात (fire) दगावलेल्या 17 कामगारांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून (Employees' Provident Fund Organisation) न्याय मिळावा या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आलं. (workers are protesting for demanding of provident fund and insurence)

SVS एकवा ही कंपनी 2012 पासून सुरू असून, त्याठिकाणी काम करत असलेल्या कामगारांची नोंद कधी पीएफ ऑफिसकडून करण्यातच आली नाही. मात्र 7 जुनला SVS एकवा कंपनीत अग्निकांडात 17 कामगार दगावल्या नंतर SVS एकवा कंपनीने 1 मे 2021 ला कामगारांची नोंद पीएफ ऑफिसकडे केल्याची बँक डेटेड इन्ट्री तयार केली. पीएफ ऑफिसमधील अधिकारी आणि एजंटच्या मदतीने SVS एकवा कंपनीने कामगाराची बँक डेटेड इन्ट्री पीएफ ऑफिसला केली. 

कामगारांची नोंद पीएफ ऑफिसला उशिरा झाल्याने कामगारांना कामगारांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून विम्याचा लाभ मिळाला नाही. कंपनी मालक आणि कामगारांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिकारी यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याने कामगारांच्या नोंदी घटना घडल्याच्या एक महिन्यानंतर करण्यात आल्या, त्यामुळे कामगारांना कामगार भविष्य निर्वाह निधी विम्याचा लाभ मिळाला नाही.

पीएफ विम्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीकडून धरणे आंदोलन
Paneer: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये 'पनीर' कसे पोहचले माहित आहे का?

याला सर्वस्वी पीएफ ऑफिस मधील अधिकारी जबाबदार असून, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे आणि कामगारांना पीएफ विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समिती कडून करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com