Mumbai : चक्क कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेऊन आंदोलन!

मागणी मान्य होत नाही तोपर्यंत या मृतदेहासह हे आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी L & T कंपनी प्रशासनाला दिला.
death body
death body SaamTvNews

नवी मुंबई : नवी मुंबईतील (New Mumbai) महापे एमआयडीसी मधील 'एल अँड टी' (L & T) कंपनीसमोर कामगारांनी धरणे आंदोलन केले. शुक्रवारी एल अँड टी कंपनीत औषध फवारणी करत असताना लोखंडी रॉड पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. मृत कामगार विनोद भोईटे याला कंपनीतर्फे (Company) आर्थिक मदत तसेच त्यांच्या मुलीला पात्रतेनुसार नोकरी देण्याची मागणी भोईटे कुटुंबीयांसह कामगार संघटनांनी केलीय.

हे देखील पाहा :

मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण होत नसल्याने कामगारांनी एल अँड टी कंपनीच्या गेटवरच मृत कामगार विनोद भोईटे याचा मृतदेह आणत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत या मृतदेहासह हे आंदोलन (Agitation) सुरु ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी कंपनी प्रशासनाला दिला. यावेळी मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून अंत्यविसाठी तात्पुरते हे आंदोलन थांबविले असले, तरी भोईटे कुटुंबियांना न्याय मिळे पर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया कामगार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com