Pune: शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काम निकृष्ट; NCPकडून चौकशीची मागणी

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशी भाजपाची अवस्था झाली आहे.
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj Pune
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj PuneSaam TV
Published On

पुणे: पुणे महापालिका (Pune Muncipal Corporation) परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यावरील मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडल्याचे आढळले असून यामुळे महापालिकेच्या कारभारावर आता विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, "मोठा गाजावाजा करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिका परिसरात पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करुन घेतले.

परंतु श्रीपाद छिंदम असो की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भाजपाचा शिवरायांबाबतचा आकस सातत्याने दिसून आला असून मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशी भाजपाची अवस्था झाली आहे. परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले असून उद्घाटनाचा अजून मंडपही हटला नसताना मेघडंबरीचा तुकडा खाली पडला आहे."

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj Pune
...अखेर बीडमधील तरुणाचा तृतीयपंथीशी विवाह संपन्न, राज्यात चर्चा...

देशमुख पुढे म्हणाले की, "भाजपाने अतिशय घाईघाईने शिवरायांच्या पुतळ्याचे काम केले असून केवळ मोदींच्या पुढे चमकोगिरी करण्यासाठी दर्जेदार काम करुन घेतले नाही, हेच यातून सिद्ध झाले आहे." केवळ निवडणुका जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण त्यांना शिवरायांबाबत किंचितही आपुलकी नाही असेही ते देशमुख म्हणाले. यानंतर या घटनेचे तिव्र पडसाद आता पडताना दिसत आहेत. पुणे महापालिकेत राडा झाला आहे. पुणे महानगर पालिकेतील महापौरांच्या कार्यालयावर काळी शाई फेक केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com