मनी लाँड्रिंग प्रकरण; महिला पत्रकार राणा अय्यूब यांना मुंबई विमानतळावर रोखलं

सक्तवसुली संचालनालयाने पत्रकार राणा अय्युब यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीकरिता समन्स बजावले
Journalist Rana Ayyub Money Laundering Case
Journalist Rana Ayyub Money Laundering Case Saam Tv
Published On

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने पत्रकार राणा अय्युब (Rana Ayyub) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Enforcement Directorate) चौकशीकरिता समन्स बजावले आहे. त्यांच्या विरोधामध्ये लूक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. एजन्सीने जारी केलेल्या लुकआउट परिपत्रकाच्या आधारावर, अयुब आज लंडनला जात असताना तिला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले आहे.

हे देखील पहा-

या अगोदर, ईडीने १.७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. राणा अय्युब यांनी एनजीओच्या निधीचा गैरवापर मदत कार्यासाठी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने अय्युबला १ एप्रिल दिवशी या प्रकरणी चौकशीसाठी बोलविण्यात आला आहे.

Journalist Rana Ayyub Money Laundering Case
काका-पुतण्याचा फॅमिली ड्रामा; विनायक मेटेंचा क्षीरसागर यांच्यावर घणाघात

या प्रकरणाविषयी महिला पत्रकाराने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे की, "पत्रकारांना धमकावण्याच्या मुद्द्यावर माझं भाषण देण्यासाठी मी लंडनला जाणार्‍या विमानात बसणार होते, तेव्हा मला थांबवण्यात आले आहे. जर्नालिझम फेस्टिव्हलमध्ये भारतीय लोकशाही या विषयावर मुख्य भाषण दिल्यावर मी लवकरच इटलीला रवाना होणार होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com