Vinayak Mete News : विनायक मेटेंच्या गाडीचा कोण करत होतं पाठलाग? पाहा स्पेशल रिपोर्ट

विनायक मेटे यांच्या अपघातानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला आहे.
Vinayak Mete
Vinayak MeteSaam Tv

Vinayak Mete Wife Jyoti Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं रविवारी कार अपघातात निधन झालं. या अपघातानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांच्या अपघातानंतर (Accident) दोन तासांत काय घडलं? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली. इतकंच नाही तर, ज्योती यांनी अपघातानंतर घडलेल्या घटनांबाबत संशय व्यक्त केला.

Vinayak Mete
Vinayak Mete accident case: मेटेंचे चालक समाधान वाघमारेंचा मोठा खुलासा; म्हणाले,' 3 ऑगस्ट रोजी आम्ही...'

काय म्हणाल्या ज्योती मेटे?

विनायक मेटेंच्या अपघातानंतर ज्योती मेटे यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. ज्योती मेटे म्हणाल्या की, 'अपघात झाल्यानंतर माझं कारचालक एकनाथ कदम याला सातत्याने एकच म्हणणं होतं की, साहेबांशी बोलणं करून दे. साहेबांच्या दोन्ही नंबरवर मी फोन केले, पण ते फोन उचलत नव्हते. माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही तर मला वाटत होतं किमान सुरक्षारक्षकाशी तरी बोलणं व्हावं, कारण तोपर्यंत मला माहीत नव्हतं की सुरक्षारक्षकही जखमी आहे. मात्र एकनाथ हा कोणाशीच बोलणं करून देत नव्हता'.

विनायक मेटेंचा नक्की कोण करत होता पाठलाग?; पाहा व्हिडिओ

दरम्यान, अपघात प्रकरणात मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या आरोपानंतर मेटे यांचे दुसरे चालक समाधान वाघमारे यांनी मोठा खुलासा केला आहे. 'शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे यांनी दिली.

समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. मात्र ,14 तारखेला त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते. समाधान वाघमारे म्हणाले की , 3 ऑगस्ट रोजी आम्ही गडबडीत मुंबईच्या दिशेने जात होतो. या दरम्यान शिक्रापूरलगत आम्हाला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. असा खुलासा वाघमारे यांनी केला आहे. त्यामुळे विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात होता की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com