महाराष्ट्रातले ओवेसी कोण हे भोंग्याच्या राजकारणावरुन कळाले- राऊत

काल हनुमान जंयती मोठ्या उत्साहात पार पडली. परंतु देशाच्या राजीधानी या उत्साहाला गालबोट लागले.
Sanjay Raut
Sanjay Raut Saam Tv
Published On

मुंबई: काल हनुमान जंयती मोठ्या उत्साहात पार पडली. परंतु देशाच्या राजीधानी या उत्साहाला गालबोट लागले. दिल्ली दोन गटात मोठी दगडफेक झाली. यावर देशातून तीव्र निषेध व्यक्त केला जा आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर कधी तणावाचं वातावरण नव्हतं कधी त्या क्षेत्रांवर हल्ले झाले नव्हते पण या वेळेला या देशातल्या काही शक्तीने ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं आहे. या राज्यातील वातावरण तणावाचं करण्याचं षड्यंत्र देखील रचलं होतं. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हा माहोल उधळून लावला आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.

Sanjay Raut
गुणरत्न सदावर्तेंची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस जाहीर, तर...

पुढे संजय राऊत म्हणाले की काही लोक या दोन्ही (राम/ हनुमान) दैवतांचा वापर राजकीय मुद्यांसाठी करत आहेत. महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहेत. या विषयावरती सरकार सोबत चर्चा होऊ शकत होती. सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, त्याच्यावरती काही कारवाई सुरू आहेत असं असताना फक्त या राज्यांमध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवट निर्माण करणारी स्थिती निर्माण करणे यासाठी हे भोंग्याचा राजकारण झालं होतं पण काल कोल्हापूरचं झालेलं मतदान आणि लोकांनी ठेवलेला संयम यामुळे हे वातावरण बदललं आहे.

बाबासाहेब पुरंदरेंच्या इतिहास लिखाणावर सध्या वाद सुरु आहे आहे. बाबासाहेब पुरंदरे हे त्यांच्यावतीने बाजू मांडण्यासाठी जीवित नाही त्यामुळे अशा व्यक्ती ज्या जीवित नाही त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही. बिगर भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विशेष करून ममता या सर्वांना शरद पवार आणि मुख्यमंत्री यांना एकत्र करून मुंबईत एक कॉन्फरन्स घेणार आहेत त्यासंदर्भात तयारी सुरू झाली असल्याचे संजय राऊत म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भूषण गगराणी यांना पत्र लिहून काही विनंत्या केल्या आहेत. किरीट सोमय्या हे आरोपी आहेत त्यांनी कोणालीही पत्र लिहावं ते विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत त्यांनी पत्र पाठवत राहावं असे राऊत म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com