संजय राऊतच पडद्यामागील सूत्रधार; पत्रा चाळ प्रकरणात ईडीने कोणकोणते आरोप केले?

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत आज पुन्हा ४ ऑक्टोंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Sanjay Raut ED Custody
Sanjay Raut ED CustodySaam TV
Published On

मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. आज त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. आज झालेल्या सुनावणीदरम्यान, राऊतांच्या कोठडीत पुन्हा ४ ऑक्टोंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीने आज राऊत यांच्याबाबतचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या आरोप पत्रामध्ये संजय राऊतांविरोधात अनेक गंभीर आरोप ईडीने (ED) केले आहेत.

ईडीने केलेले आरोप -

ईडीने आरोपपत्रात खुलासा केला की, राकेश वाधवान, सारंग वाधवन, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांनी एकमेकांच्या संगनमताने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या (Ashish Construction Private Limited) माध्यमातून पत्रा चाळ पुनर्विकासाच्या प्रकल्पातून पैसे कमावल्याचे तपासात समोर आले आहे.

पाहा व्हिडीओ -

पत्रा चाळ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत हा फक्त चेहरा आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच सर्व गोष्टी करत असल्याचे म्हटले आहे. प्रवीण राऊत यांचे संजय राऊत यांच्याशी कौटुबिक संबध आहेत. पत्रा चाळ प्रकरणात म्हाडा आणि सरकारमधील इतर अधिकाऱ्यांसोबतच्या प्रवीण राऊत यांच्या मिटींग संजय राऊत यांनीच घडवून दिल्या होत्या.

पत्रा चाळ पुर्ननिविकास प्रकल्पासाठी सरकारी परवानग्या व फायद्यासाठी २००६-२००७ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री यांच्यासोबत प्रवीण राऊत व वाधवान बंधुंची मिटींगही संजय राऊत यांनी घडवल्याचे ईडीच्या तपासात समोर आलं आहे.

राऊत या संपूर्ण प्रकरणात पडद्यामागून सूत्र हलवत होते. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रवीण राऊत यांचे २५ टक्के शेअर्स होते. मात्र, या कंपनी सर्व निर्णय प्रवीण राऊत हे न घेता संजय राऊतच घेत होते. प्रवीण राऊत यांनी त्याच्या जबाबात असे म्हटले आहे की, पत्राचाळ हा प्रकल्प अंदाजे ७४० कोटींचा होता. या प्रकल्पात प्रवीण राऊत यांचे २५ टक्के शेअर असल्याने प्रवीण राऊत हे १८० कोटीचे मालक होते. मात्र, या गुन्ह्यात या आरोपींना या पेक्षाही जास्त पैशाचा फायदा झाला असल्याचा संशय ईडीला आहे.

तसेच संजय राऊत यांच्यासाठी अनेक परदेश दौरे व काही वैयक्तिक खर्च हे प्रवीण राऊत यांनी केले होते. हे सर्व खर्च याच पैशातून केले असल्याचा दावाही ईडीने आरोपपत्रात केला आहे. संजय राऊत यांनी प्रवीण राऊतांकडून मोठ्या प्रमाणात पैसे स्विकारले. मात्र या पैशांचा मुख्यस्रोत हा गुरू आशिष कंपनीच असल्याचे ईडीने आरोप पत्रात म्हटले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पत्राचाळ हा प्रकल्प सुरूवातीला १३ एकरात पुर्नविकास केला जाणार होता. मात्र, यात संजय राऊत यांची इंट्री होताच हा पुर्नविकास प्रकल्प ४७ एकरात राबवण्यात आला असल्याचंही ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com