Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! शहरात कोणतीही पाणी कपात होणार नाही

Pune Water News: पुणेकरांना मोठा दिलासा! शहरात कोणतीही पाणी कपात होणार नाही
Pune Water Supply Updates
Pune Water Supply UpdatesSaam TV
Published On

Pune Water News:

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात कोणतीही पाणी कपात होणार नसल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडे पाच वाजता कालवा समितीची बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यात पुरेसा पाणीसाठा असल्याने कोणत्याही प्रकारची पाणी कपात केली जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. या संबंधित पुढील बैठक 15 ऑक्टबरला होणार आहे. त्या बैठकीत तेंव्हाची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

Pune Water Supply Updates
Maratha Andolan: फडणवीस यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत आंदोलन; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरली नाहीत या पार्श्वभूमीवर आज कालवा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती, मात्र तसं काही झालं नाही.  (Latest Marathi News)

दरम्यान, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये सध्या २७.६० टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हा साठा २९.०६ होता. आगामी काळात पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने पाणी कपात केली जाऊ शकते.

Pune Water Supply Updates
ATM कार्डवर मिळतो १० लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

हवामान विभागाने यंदाचा पाऊस सर्वसाधारण असण्याची शक्यता वर्तवली होती. सध्याची परिस्थिती ही तशीच आहे. फारसा पाऊस नसला तरी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीत शेतीलाही पाणीपुरवठा करावा लागणार असल्याने पुणेकरांवर भविष्यात पाणी कपातीचे संकट येऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com