Pune Water Cut News: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water Cut News: पाणी जपून वापरा असं आवाहनही महापालिकेकडून नागरिकांना करण्यात येत आहे.
Pune Water Supply News
Pune Water Supply NewsSaam Tv
Published On

Pune News : पाण्याच्या बचतीसाठी पुणे महापालिकेने संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापुढे काही दिवस दर गुरुवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लांबणारा पाऊस आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवार आणि शनिवारी यामुळे काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पाणी जपून वापरा असं आवाहनही महापालिकेकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

Pune Water Supply News
Mumbai Crime News: बोगस पतपेढी तयार करून कोट्यवधींचा घोटाळा; 4000 कष्टकऱ्यांची फसवणूक

काही गावांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद करु नये- सुप्रिया सुळे

मात्र आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या उपनगरांना जास्तच त्रास सहन करावा लागेल. ही अडचण लक्षात घेऊन पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Pune News)

Pune Water Supply News
Mumbai Rain Alert: मुंबईकरांचे टेन्शन दूर! पावसाळ्यात मोबाईलवर 'SMS' द्वारे मिळणार हवामानाचे सर्व अपडेट्स

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना खासदार सुळे यांनी याबाबत पत्र पाठवले असून तसे ट्वीटही केले आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी, नऱ्हे, नांदोशी, सणसनगर आदी गावांमध्ये सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशातच महापालिकेने एक पत्रक जारी करुन दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याचे नमूद केले आहे. नागरीकांना ही अस्वस्थ करणारी बाब आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com