Ulhasnagar : उल्हासनगरकरांची नववर्षाची पहाट उजाडली राड्याने; चाैघांवर चाॅपरने हल्ला, दाेघे पाेलिसांच्या ताब्यात

विठ्ठलवाडी पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.
Ulhasnagar Crime News
Ulhasnagar Crime News saam tv
Published On

Gudi Padwa 2023 : आज मराठी नववर्षाचा (marathi new year) पहिला दिवस. गुढीपाडवा (gudi padwa 2023) आणि नववर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी उत्साह असतानाच उल्हासनगर (ulhasnagar camp 4) येथे मात्र पहाटेच्या सुमारास मारामारी आणि लूटमारीचा प्रकार घडला आहे. या घटनेने उल्हासनगर कॅम्प 4 परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

Ulhasnagar Crime News
Loss of Strawberry : शेतक-याचा स्वप्नांचा झाला चिखल, जिद्दीने पिकवलेली लाल चुटुक स्ट्रॉबेरी मातीमाेल

उल्हासनगर कॅम्प 4 भागात पहाटे साडे तीन वाजता काही युवकांनी चार जणांवर चॉपरने हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. या युवकांनी काहींचे मोबाईल आणि पैसे काढून घेतले असे देखील सांगण्यात येत आहे.

Ulhasnagar Crime News
Social Media त स्वतःलाच श्रद्धांजली वाहून युवकाची आत्महत्या

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार उल्हासनगर कॅम्प 4 भागात तीन जणांवर हल्ला करण्यात आला. तसेच उल्हासनगर कॅम्प भागात एकावर हल्ला झाला आहे. हल्ला करणारे रिक्षातून फिरत होते. या घटनेतील जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये रवी निर्भवणे, विद्यानंद पांडे, रोहित पंडित अन्य एका जखमीचा समावेश आहे.

दरम्यान या घटनेतील संशयित म्हणून विठ्ठलवाडी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पाेलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com