Vitthal Maharaj Shastri Accident : मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

Vitthal Maharaj Shastri Accident In ahmednagar : बीडमधील गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात
Vitthal Maharaj Shastri Accident : Saam tv

बीड : बीडमधील गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. अपघातानंतर विठ्ठल महाराज शास्त्री यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलणाऱ्या बीडच्या गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात झाला. गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातानंतर विठ्ठल महाराज शास्त्री हे जखमी झाले आहेत. महाराजांच्या अपघातानंतर त्यांच्यावर नगरच्या साईदीप हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार सुरु आहेत.

मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात
Gondia Accident : भरधाव ट्रॅक्टर घरात घुसला; महिलेचा जागीच मृत्यू, दोन मुली थोडक्यात बचावल्या

विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये हा अपघात झाला. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारचा टायर फुटताच त्यांची गाडी खड्ड्यामध्ये जाऊन आदळली. या अपघातात विठ्ठल महाराज यांना किरकोळ दुखापत झाली आहे. विठ्ठल महाराजांवर साईदीप हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार सुरू आहेत. सध्या विठ्ठल महाराजांची प्रकृती स्थिर आहे. तसेच ते सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे.

मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात
Pune Porsche Accident : बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलावर आमदार पत्नीचे गंभीर आरोप; कारनामे केले उघड

वर्ध्यात खासगी बस आणि एसटीचा भीषण अपघात

वर्ध्यातील केळझर येथे ट्रॅव्हल्स आणि बसला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

केळझरमधील शहीद हरिभाऊ लाखे चौकात ही अपघाताची घटना घडली आहे. सेलू येथील बृहस्पती मंदिरातून आजनसरा ही खासगी बस जात होती. या बसमधील प्रवासी हे टाकळघाट येथील राहणारे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com