Virar News: सख्ख्या भावाच्या मृत्यूनंतर PSI ने उचललं टोकाचं पाऊल, विरारमध्ये खळबळ

PSI End Life In Virar: विरारच्या बोळींज पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकांनी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Virar News: सख्ख्या भावाच्या मृत्यूनंतर PSI ने उचललं टोकाचं पाऊल, विरारमध्ये खळबळ
PSI End Life In VirarSaam Tv
Published On

महेंद्र वानखेडे, मिरा भाईंदर

विरारमध्ये पोलिसाच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी बोळींज पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या रतिकांत भद्रशेट्टे (३५ वर्षे) यांनी आत्महत्या केली. रतिकांत हे बोळींज परिसरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. मंगळवारी दुपारी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. घरामध्ये बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

रतिकांत भद्रशेट्टे यांच्या पत्नी कामावरून घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. रतिकांत यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ बोळींज पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रतिकांत यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णलयामध्ये पाठवला.

पोलिस उपनिरीक्षक रतिकांत भद्रशेट्टे मागील दीड वर्षापासून अर्नाळा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी रतिकांत यांच्या सख्ख्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. मात्र रतिकांत यांनी आत्महत्या का केली? यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com