Viral Video : 'भीमानं माय सोन्यानं भरली ओटी...',मरीन लाइन्सवर तरुणाईचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

त्यांना पाहून येथून येणाऱ्या जाणाऱ्या वृध्द व्यक्ती आणि लहान मुलं देखील त्यांच्यात सहभागी झालेत.
Viral Video
Viral VideoSaam TV

Marine Lines Video : मुंबई आणि तिथली गर्दी हे एक अनोखं समीकरण झालं आहे.अशात मुंबईतील गगनचुंबी इमारतींप्रमाणे येथील चौपाट्या आकर्षणाचा विषय आहेत. मुंबईची चौपाटी म्हटल्यावर मरीन लाइन्सला भेट देणं आलंच.समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा आणि मरीन लाइन्सच्या कट्ट्यावर तासंतास एकमेकांचा हात हातात घेऊन बसलेली जोडपी येथे हमखास पहायला मिळतात. अशात याच मरीन लाइन्सवर अनेक जण आपली कला देखील जोपासतात. कोण गाणं गातं तर काही जण आपल्यातील चित्रकलेची कला आणि डान्स करून दाखवतात. सध्या सोशल मीडियावर येथीलच एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. (Latest Marine Lines viral Video)

मरीन लाइन्सचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. अशात येथे एक तरुण आपल्याच धुंदीत नाचत आहे. मात्र यावेळी तो फक्त नाचत नाही तर महापुरुषांच्या गाण्यांवर देखील ताल धरत आहे. हल्लीच्या तरुण पिढीला इंग्रजी किंवा बॉलिवूडच्या गाण्यांची जास्त आवड असल्याचे दिसते. मात्र अशातही आपली संस्कृती जपत या तरुणांनी महापुरुषांची गाणी गात त्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'भीमानं माय सोन्यांन भरली ओटी... ' या गाण्यावर सर्व तरुण मंडळी नाचताना दिसत आहेत. त्यांना पाहून येथून येणाऱ्या जाणाऱ्या वृध्द व्यक्ती आणि लहान मुलं देखील त्यांच्यात सहभागी झालेत.

आकाश साळवी या तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच त्याला लाखोंमध्ये लाइक्स मिळालेत. तसेच अनेकांच्या स्टेटसला हा व्हिडिओ पहायला मिळतो आहे. आकाश स्वतः एक डान्सर आहे. नागरिकांना धावपळीच्या जीवनात थोडा विरंगुळा मिळावा म्हणून तो गेल्या काही दिवसांपासून मरीन लाइन्सवर आपल्या डान्समधून नागरिकांचं मनोरंजन करत आहे.

या आधी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेलं 'राजं आलं राजं आलं...' या गाण्यावर देखील असाच व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाला आहे. मरीन लाइन्सवर अनेक जण मॉर्निंग वॉकसाठी येतात.शरीर सुदृढ रहावं म्हणून वेळ मिळेल तसं कसरती करतात. डान्स केल्याने आपल्या शरीराचा व्यायाम देखील होतो. त्यामुळे हा तरुण लोकांकडून नकळतपणे कसरतही करून घेत आहे असं म्हणायला हरकत नाही.

सध्या त्याचा 'भीमानं सोन्यानं भरली ओटी...' या गाण्यावरचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. हे गाणं गायिका कडूबाई खरात यांनी गायलं आहे. आपल्या मधुर आवाजात त्यांनी गायलेलं हे गाणं भीम जयंतीमध्ये हमखास ऐकायला मिळतं. आपल्या गाण्यातून कडूबाई यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात असलेली परिस्थिती नेमकी कशी होती हे सांगितलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com