Viral Video : उतावळ्या नवरीची स्टंटबाजी अन् पाेलिसांची कारवाई

bride sitting on car bonet
bride sitting on car bonet

पिंपरी चिंचवड : आपले लग्न marriage जरा हटके व्हावे यासाठी प्रत्येक जण काही ना काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असते. नवं विवाहित जोडपं काही तरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव तर धाेक्यात घालत नाही ना असा प्रश्न पडताे. मात्र हे प्रयत्न करत असताना काही अतिउत्साही जोडप्यांना कायद्याच्या धाकाच ही विसर पडल्याच पाहण्यात येत. भाेसरी येथील एका मुलीने विवाहस्थळी जाण्यासाठी वाहनावरील बाेनेटवरुन bride sitting on car bonet केलेला प्रवास अंगलट आला. नववधूसह, वाहन चालक, चित्रीकरण करणा-यांवर लाेणी काळभाेर पाेलिसांनी माेटार वाहन कायदा निमयांचे आणि काेविड 19 नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई केली आहे. (viral-video-bride-travelling-dangerously-dive-ghat-trending-news)

पुण्यातील दिवे घाटातील एक व्हिडिआे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या व्हिडिआेत पुण्यातील भोसरी परिसरात राहणारी एका मुलगी चक्क वाहनाच्या बाेनेटवर बसून प्रवास करत असताना दिसत आहे. संबंधित मूलगी ही वधू असावी असा अंदाज बांधला जात हाेता. या वधूने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी चार चाकीच्या बाेनेटवर बसुन मिरवत थेट दिवे घाटात मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केल्याची चर्चा हाेती.

सासवड जवळील सिध्देश्वर मंगल कार्यालयात मंगळवारी एक विवाह हाेता. या विवाहासाठी एकाने कुटुंबाने चार चाकीतून दिवे घाटातून मार्गक्रमण केले. या घाटातील एका ठिकाणी एक मुलगी सजून धजून चार चाकीच्या बाेनेटवर बसलेली हाेती. संबंधित वाहन हळू हळू पुढे सरकत हाेते. या वाहनाचे चित्रीकरण करण्यासाठी दाेघेजण दुचाकीवरुन आले. त्यांनी संबंधित वाहनाचे चित्रीकरण केले.

bride sitting on car bonet
साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक अमूल्य ठेवा

उत्साहाच्या भरात वाहनावरील बसलेली संबंधित मुलगी चित्रीकरण करणा-यांकडे स्मितहास्य करीत असल्याचे व्हिडिआेत दिसून येत हाेते. या वाहनात ज्येष्ठ नागरिक देखील बसले हाेते. दरम्यान तिच्या या कृत्यामुळे तिने व कुटुंबियांना चक्क कायद्याचा धाकाचा विसर पडला आहे की असेच ते चित्र हाेते. धोकादायक रीतीने प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या नवरी मुलीचा व्हायरल व्हिडिआे पाेलिसांपर्यंत पाेचला. पाेलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे. याबाबत लाेणी काळभाेर पाेलिस ठाण्यातील अधिकारी म्हणाले संबंधित व्हायरल व्हिडिआेची दखल घेत कर्मचा-यांनी नववधूसह, वाहन चालक, चित्रीकरण करणा-यांवर लाेणी काळभाेर पाेलिसांनी माेटार वाहन कायदा निमयांचे आणि काेविड 19 नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com