पुणे : पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथे सोशल डिस्टन्स व कोरोना नियमांचा आमदारांच्या कार्यकर्त्यांनी फज्जा उडवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (District Central Co-operative Bank) संचालक पदी निवड झाल्याने त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी घोड्यावरती बसवून मिरवणूक काढली.
मात्र या मिरवणूकीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी जमली होती. आधीच पुण्यात कोरोना (Corona) रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये गर्दी जमवली तर कोरोनाचा संसर्ग जास्तच वाढणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारांनाच कोरोना नियमांचा विसर पडतोय का असा सवाल सामान्य पुणेकर वितारत आहेत.
हे देखील पहा -
अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क (Mask) नाही, तसेच सोशल डिस्टन्सिंग (Social Distance) देखील पाळलं नाहीये, एकीकडे राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मास्क घाला गर्दी करु नका असं संपुर्ण राज्याला सांगत असताना त्यांच्याच आमदाराने केलेल्या या गर्दीवरती ते काय कारवाई करणार का असही नागरिक विचारत आहेत.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.