शेतकरी मेळाव्यात कोरोना नियमांचे उल्लंघन; आयोजकांवर गुन्हा दाखल

जुन्नर येथे स्वर्गीय शिवाजीराव काळे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात व शेतकरी मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
शेतकरी मेळाव्यात कोरोना नियमांचे उल्लंघन; आयोजकांवर गुन्हा दाखल
शेतकरी मेळाव्यात कोरोना नियमांचे उल्लंघन; आयोजकांवर गुन्हा दाखलरोहिदास गाडगे
Published On

पुणे: जुन्नर येथे स्वर्गीय शिवाजीराव काळे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात व शेतकरी मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्या प्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात संजय काळे, दिलीप डुंबरे, रूपेश कवडे, धनेश संचे, निवृत्ती काळे या पाच जणांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Violation of corona rules at farmers meet; Filing a crime against the organizers)

हे देखील पहा -

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अतुल बेनके, आमदार दिलीप मोहिते, आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप यांसह माजी आमदार आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सारखे इतर अनेक अधिकारीही उपस्थित होते.

शेतकरी मेळाव्यात कोरोना नियमांचे उल्लंघन; आयोजकांवर गुन्हा दाखल
माजलगावमधील धरण शंभर टक्के भरलं; तब्बल 11 दरवाजे उघडले

कोरोना काळात अटी शर्तींपेक्षा जास्त गर्दी जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com