मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरला

विहार तलाव बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असून मुंबईला पाणी पुरवठा करणारा सर्वात लहान तलाव म्हणून हा तलाव ओळखला जातो.
मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरला
मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरलाSaam tv

बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) क्षेत्राला पाणीपुरवठा करणारा ‘विहार तलाव’ (Vihar Lake) आज सकाळी ९ वाजण्याच्या सुनारास दुथडी भरुन‌‌ वाहू लागला. विहार तलाव बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असून मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water Supply) करणारा सर्वात लहान तलाव म्हणून हा तलाव ओळखला जातो. (Vihar Lake, which supplies water to Mumbai, is full)

गेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी हा तलाव दोन आठवडे आधीच भरला आहे. गेल्यावर्षी ०५ ऑगस्‍ट विहार तलाव पूर्ण भरला होता. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरला
गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी

बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव भरल्या नंतर आज विहार तलावही पूर्ण भरून पाणी वाहू लागलंय . त्यामुळे मुंबईकरांवर येणारं पाणी संकट दूर गेलंय .

विहार तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे

- बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.

- या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.

- या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

- या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.

- तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो.

- हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com