Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेसाठी महायुतीचे पाचही उमेदवार ठरले, कोणत्या पक्षाकडून कुणाली संधी?

Maharashtra Legislative Council By-Election: महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून ५ जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे.
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath ShindeSaam Tv
Published On

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. या जागांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. अशाप्रकारे विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी महायुतीचे पाचही उमेदवार ठरले आहेत.

विधानपरिषदेषच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपला ३, शिवसेना शिंदे गटाला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक जागा देण्यात आली आहे. रविवारी भाजपकडून विधानसभेच्या या रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली. भाजपने संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आज शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

शिवसेना शिंदे गटाकडून आज उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाकडून संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. संजय खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटामधून अनेक जण या जागेसाठी इच्छुक होते. पण शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांची नावं देखील चर्चेत होते. पण एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत सूर्यवंशी यांचे नाव फायनल केले. चंद्रकांत सूर्यवंशी हे १९९२ पासून राजकारणात सक्रीय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com