Vasant More: मला चंद्रकांतदादांची ऑफर आली होती; मी त्यांना म्हणालो...

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती, मात्र आज त्यांनी ठाण्यातील सभेत पहिलं भाषण केलं.
Vasant More
Vasant MoreSaam TV
Published On

ठाणे : मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आज राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तर सभेत भाषण केलं यावेळी बोलताना ते म्हणाले, 'जवळपास दोन वर्षांनी पाडव्याच्या सभेला एकत्र आलो आहोत. आपण खऱ्या अर्थान भाग्यवान समजलं पाहीजे कारण, दोन वर्ष आपल्या तोंडाला मुसक्या होत्या मात्र, आता त्या नाहीत आपण एकमेकांना पाहत आहोत. त्यासाठी सर्वांनी परमेश्वराचे आभार मानायला पाहीजेत.

पुण्यात मनसेनं (Pune) कोरोना काळात काम केलं. फायनान्सवाला, बँकवाला दारात आला की मनसेवाला आठवतो मात्र, निवडणुका लागल्यावर लोक मनसेवाल्यांना विचारत नाहीत असही वसंत मोरे म्हणाले. मी वर्षभरापासून पाहतोय त्यांची तब्यतीमध्ये अनेक अडचणीत आहेत. मात्र ते काम करत आहेत जर साहेब या सर्व गोष्टी करतात तर आपण कशा पद्धतीने काम करतो. मी ब्लू प्रिंटमध्ये काय काम केलं हे कात्रजमध्ये येऊन पहा असंही ते म्हणाले.

पुण्यात भाजपचे १०० नगरसेवक आहेत, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक आहेत. मात्र, मनसेच्या २ नगरसवकांनी पुण्यात विकास केला आहे. आपण राजू दादा अविनाश दादांच काम लोकांसमोर पोहचवणार आहोत की नाही. ते पोहचवायला पाहिजे. सोळा वर्षात सोळा गार्डन करणारा मी एकमेव आहे. असंही ते यावेळी म्हणाले. तसंच चर्चेतील चेहरा म्हणून मला पुरस्कार दिला यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले होते, 'भाजपात या नगरसेवक व्हाल;' मी त्यांना म्हणालो दादा भाजपवाल्यांना हरवूनच मी नगरसेवक झालो असही ते म्हणाले.

आपण प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं की राज साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा असेल तर काम करायला हवं. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मला पक्षात यायची विनंती केली जर ठाकरेंच्या हातात आपण सत्ता दिली तर अमेरीकेमधून आपल्या नगरसेवक आमदारांना फोन येतील असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com