9 वाजून गेले, नौटंकी बंद करा, हिंमत असेल तर...; वरुण सरदेसाईंचा इशारा (पाहा Video)

मातोश्री' आमचे दैवत आहे. तुमची नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा, असा थेट इशारा राणा दांपत्याला युवा नेते वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.
Rana Couple and Varun Sardesai
Rana Couple and Varun SardesaiSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई: हिम्मत असेल तर येऊन दाखवा, वारंवार मीडियाच्या प्रसिद्धीकरिता 9 वाजता, 10 वाजता, 12 वाजता करण बंद करा. तुम्ही दिलेली वेळ टळून गेली आहे, तुम्ही अद्याप घरातच आहात. तुम्ही याच, तुमच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत. 'मातोश्री' आमचे दैवत आहे. तुमची नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा, असा थेट इशारा राणा दांपत्याला युवा नेते वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्य यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणारच असे काल पत्रकार परिषद घेऊन ठामपणे सांगितले होते. तसेच शिवसेना कार्यकर्तेही राणांच्या घराबाहेर कालपासून ठाण मांडून बसले आहेत. मुंबईत राणा दाम्पत्याच्या घराबाहेर तसेच मातोश्रीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र, 'मातोश्री'बाहेर तुमची वाट पाहत आहोत, शिवसैनिक तुमचे स्वागत करायला आतुर आहेत काल मोहित कंबोज यांना प्रसाद मिळाला आज तुम्हाला महाप्रसाद मिळेल, असे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Rana Couple and Varun Sardesai
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून मातृत्व लादणाऱ्या नराधम वृद्धाला जन्मठेप

यावेळी बोलताना सरदेसाई म्हणाले, बिग बॉसमध्ये कस असत जेव्हा ते सुरु असते तेव्हा 2-3 महिने ते फेमस असतात नंतर मात्र त्यांना कोण काळ कुत्रा विचारत नाही असली यांची परिस्थिती झाली आहे. आत्ता त्यांना माहित आहे 2 दिवस त्यांना चमकायची संधी आहे म्हणून ते वारंवार प्रयत्न करत आहेत. आमच्यासाठी ते काही महत्वाचे नाहीत आमच्यासाठी त्यांच्या आडून जे भाजपावाले प्रयत्न करतायत ज्यांना वाटतंय की मातोश्री वर चालून येण खूप सोप्प आहे त्यांच्याकरिता आम्ही रस्त्यावर उतरवले आहोत.

पाहा व्हिडीओ-

ते म्हणाले, अजूनही माझं शिवसैनिक म्हणून त्यांना आव्हान आहे, 9 वाजून गेलेले आहेत, कमीतकमी 10 वाजता या, 11 वाजता या आम्ही आहोत. त्यांना आधी येऊ द्या. त्यांना विचारा तुमची नौटंकी कधी संपणार?

दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी सकाळी 9 वाजता मातोश्रीवर पोहोचणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्या घराबाहेर असणारी शिवसैनिकांची गर्दी पाहता आता ते घराबाहेर कसे पडणारच हा प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com