Vaibhav Kale : कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; गाझातील बॉम्ब हल्ल्यात झाले होते शहीद

Vaibhav Kale News : शहीद कर्नल वैभव काळे (निवृत्त) यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट मुक्तीधाम स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
Vaibhav Kale
Vaibhav Kale Saam Digital

शहीद कर्नल वैभव काळे (निवृत्त) यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट मुक्तीधाम स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहीद कर्नल वैभव काळे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.भारतीय सैन्याच्यावतीने दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल आर. एस. सुंदरम यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. वैभव काळे यांचा मुलगा वेदांत आणि मुलगी राधिका यांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

गाझातील राफा प्रांतातून युनूस भागात प्रवास करत होते. भारतीय लष्करातून निवृत्त झालेले वैभव काळे हे युनायटेड नेशन्सच्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या कामासाठी तैनात होते. यादरम्यान इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले. वैभव काळे यांचं पार्थिव दुपारी अंत्यदर्शनासाठी पुण्यातील कल्याणी नगरमधील त्यांच्या घरी आणण्यात आलं होतं. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैभव काळे हे केवळ ४६ वर्षांचे होते. पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय सुरक्षा अकादमीतून त्यांनी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या ११ व्या बटालियनमध्ये २०२० पर्यंत कार्यरत होते. त्यांनी लष्करात जवळापस २२ वर्षे सेवा बजावली आहे.

Vaibhav Kale
Kolhapur News : जत्रेसाठी आलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला; वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू

कर्नल वैभव काळे यांनी २०२२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी दोन खासगी कंपन्यांमध्ये नोकरीही केली. यानंतर त्यांनी युनायटेड नेशन्सल अंतर्गत काम करण्यास पसंती दिली. त्यांनी संरक्षण समन्वयक अधिकारी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता.

Vaibhav Kale
Beer Bar परवाना देण्यासाठी घेतली सव्वातीन लाखांची लाच, अधिका-यास अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com