मुंबईत लसीकरण घोटाळा, मध्यप्रदेशपर्यंत धागेदोरे !

मुंबईत लसीकरणाच्या नावाखाली हाऊसिंग सोसायटीची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबईत लसीकरण घोटाळा

मुंबईत लसीकरण घोटाळा

Saam Tv

Published On

मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरात हिरानंदानी इस्टेट सोसायटीने बोगस लसीकरणाची तक्रार केल्यानंतर खळबळ माजली आहे. सोसायटीने आपण लसीकरण घोटाळ्यास बळी पडल्याची तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Vaccination scam in Mumbai threads to Madhya Pradesh

हे देखील पहा -

फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच मध्यप्रदेशातून एकाला ताब्यात देखील घेण्यात आले आहे. फक्त सोसायटीच नाही तर मॅचबॉक्स पिक्चर्सनेही आपल्या कर्मचाऱ्यांची लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत हा मोठा घोटाळा असल्याची शक्यता व्यक्त होत असून रुग्णालयातील कर्मचारी यामागे असल्याचा संशय आहे.

<div class="paragraphs"><p>मुंबईत लसीकरण घोटाळा</p></div>
परळीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास अटक..!

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करत मध्य प्रदेशातील सटणा येथून करीम नावाच्या एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे. घोटाळा उघड झाल्यानंतर करीमने मुंबईतून पळ काढला होता. करीम यानेच लसींचा पुरवठा केल्याचा संशय व्यक्त होत आहे. सोसायटीमधील रहिवाशांना देण्यात आलेल्या लसींच्या डोसची वैधताही पोलिसांकडून तपासली जात आहे. पोलीस सध्या पालिकेच्या रिपोर्टची वाट पाहत आहेत.

लसीकरण रॅकेटविरोधात अजून एक तक्रार दाखल

मॅचबॉक्स पिक्चर्सने आपल्या कर्मचाऱ्यांच्या बोगस लसीकरणाविरोधात तक्रार केली आहे. मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पहिली तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून सध्या दोन्ही तक्रारींची चौकशी केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com