तेलाचा जास्तीत जास्त २ वेळा वापर करा, नाहीतर कारवाई अटळ!

खाद्य पदार्थ तळताना अन्न कणे काळपट होण्यापुर्वीच काढून टाकावीत.
Edible OIl
Edible OIl Saam TV

मुंबई: अन्नपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा जास्तीत जास्त २ वेळा वापर करुन संपवावे तर ते पुन्हा तळण्यासाठी वापरले तर त्यातील पोलर कंपाउंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरित परिणाम करते. अन्न पदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुर्नवापर केला तर त्यामुळे कर्करोग, हृदयविकार व पचनासंबंधी आजार होण्याचा धोका संभव आहे. खाद्यपदार्थ तळण्यासाठी लोखंडी कढई न वापरता स्टिल कढई वापरावी. शक्यतो वनस्पती तेलाचा वापर करावा, खाद्य पदार्थ तळताना अन्न कणे काळपट होण्यापुर्वीच काढून टाकावीत.

जे अन्न व्यावसायिक नियमांचा भंग करुन खाद्यतेलाचा वारंवार वापर करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांचेवर अन्न सुरक्षा कायदा २००६, नियम व नियमन २०११ अन्वये कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व अन्न व्यवसायिकांनी नोंद घ्यावी.

Edible OIl
Pakistan Galli : जालन्यात चक्क पाकिस्तान गल्ली! परतूर नगर परिषदेचा कारभार...

दररोज ५० लिटरपेक्षा अधिक तेलाचा वापर करीत असलेल्या व्यवसायिकांनी साठ्याबाबत नोंद ठेवणे बंधनकारक आहे असे पुर्नवापर करण्यात आलेले व साठवून ठेवलेले खाद्यतेल केंद्रिय अन्न सुरक्षा व मानदे पाधिकरण नवी दिल्ली यांची मान्यता असलेल्या बायोडिझेल उत्पादक कंपनी आणि त्यांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देणे बंधनकारक आहे. सदर पुर्नवापर केलेल्या खाण्यास अयोग्य असल्याने खाद्यतेल बायोडिझेल उत्पादक सदर कंपनीमार्फत अन्न उत्पादक व्यवसायिकांचे शासन नियमाप्रमाणे सदर खर्चाची रक्कम देण्यात येईल.

मुंबई शहरासाठी मे E RISK BIO ENERGY यांची स्थानिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांचा दुरध्वनी क्रमांक ९८९२०५४७२५ असा आहे. तसेच वापरुन किती तेल शिल्लक राहिले आहे व तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकला दिले या संबधीची नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. याबाबतीत बृहन्मुंबई विभागात ३३ अन्न व्यावसायीकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई नियमीत सुरु राहणार आहे. याची अन्न व्यावसायीकांनी नोंद घ्यावी.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com